बेकायदेशीररित्या गावठी कट्टे व जिवंत काडतुसे घेऊन अहमदनगर शहरात फिरणाऱ्या दोन तरूणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.गणेश अरूण घोरपडे (वय ३५), राहुल श्रीरंग अडागळे (वय ३० दोघे रा. सिद्धार्थनगर, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. अहमदनगर शहरातील अहमदनगर काॅलेज जवळ मंगळवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली.त्यांच्याकडून ५५ हजार ६०० रूपये किंमतीचे देशी बनावटीचे दोन गावठी कट्टे, दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई कमलेश पाथरूटयांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घोरपडे व अडागळे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली.
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
नरबळीची कसून चौकशी व्हावी अनिंसचे पत्रक!
नरबळीची कसून चौकशी व्हावी अनिंसचे पत्रक! October 05, 2021कोल्हापूर - जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील वारणा कापशी येथून बेपत्ता झालेल्या आरव केसरे या बालकाचा...
संसदेच्या सुरक्षेचा प्रचंड भंग : ४ लोक, २ घटना, लोकसभेत धुमाकूळ
नवी दिल्ली: बुधवारी दुपारी संसदेत शून्य तासादरम्यान दोन व्यक्ती, अद्याप अज्ञात पिवळा धूर सोडणारे डबे घेऊन आलेल्या...
प्रेयसीच्या वडिलांवर नाराज, व्यक्तीने चोरला फोन, योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी
लखनौ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मैत्रिणीच्या वडिलांच्या नंबरवरून...
पीएम मोदींची बीबीसी डॉक्युमेंटरी: माजी रॉ प्रमुख याला ‘पूर्वग्रहदूषित’ म्हणतात
रॉचे माजी प्रमुख संजीव त्रिपाठी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील माहितीपटासाठी बीबीसीवर टीका केली. याला "पूर्वग्रहदूषित", "पक्षपाती"...




