अहमदनगर : नगर- आष्टी रेल्वेला वाळूंज (ता. नगर) जवळ आग लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार पहिल्या दोन डब्यांना लागली आहे. गाडीत गर्दी नसल्याने सुदैवाने कोणालाही इजा नाही. स्थानिक ग्रामस्थ आणि अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीत रेल्वेचे मोठे नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. आगीचं प्रमाण वाढल्यानंतर एकूण गार्ड ब्रेक कोच आणि चार डबे असे एकूण पाच डब्यांना आग लागली आहे.अहमदनगर आणि आष्टी हा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. या मार्गावरील रेल्वेला कोणत्या कारणामुळं लागली हे अद्याप समोरg आलेलं नाही. आग कशामुळं लागली याचा शोध रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे. साडे तीन ते चारच्या दरम्यान आग लागल्याचं सांगितलं जात आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या गाडीतील प्रवासी वेळेतच खाली उतरल्यानं बचावले आहेत. सुरुवातीला दोन डब्यांना आग लागली होती त्यानंतर आगीचं प्रमाण वाढल्यावर एकूण पाच डब्यांना आग लागल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.. आग लवकरच नियंत्रणात येईल असं, प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.