अहमदनगरमध्ये मनसेचा उमेदवार आघाडीवर

750

अहमदनगर : महानगरपालिकेच्या एका जागेसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीमध्ये मनसेचे उमेदवार पोपट पाथरे आघाडीवर आहेत. महानगरपालिकेच्या जुन्या प्रभाग समिती कार्यालयात मतमोजणी सकाळी नऊ वाजता सुरू झाली. महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश तिवारी (शिवसेना) व भाजपचे प्रदीप परदेशी व मनसे चे पोपट पाथरे अशा तीन प्रमुख उमेदवारांमध्ये लढत झाली होती.पाथरे यांना सातशेच्या पुढे मते मिळाली असून शिवसेनेचे सुरेश तिवारी यांना 300 पेक्षा जास्त मते मिळाली आहेत. तर भाजपचे प्रदीप परदेशी यांना 200 पेक्षा जास्त मते मिळाली आहेत पहिल्या फेरीचा हा निकाल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here