अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड (Ahmedngar Kedgaon Double Murder) प्रकरणात फरार असलेल्या माजी उपमहापौरांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. आरोपी सुवर्णा कोतकर (Suvarna Kotkar) यांना अहमदनगर जिल्हा न्यायालयाने अटी-शर्थींसह जामीन मंजूर केला आहे. एप्रिल 2018 मध्ये केडगाव उपनगरात शिवसेनेचे (Shiv Sena) उपशहरप्रमुख संजय कोतकर आणि विभागप्रमुख वसंत ठुबे या दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. दोघांवर गोळ्या झाडून हल्लेखोरांनी कोयत्याने सपासप वार केले होते. तत्कालीन अहमदनगर महापालिका पोटनिवडणुकीवरुन दोघा शिवसैनिकांची हत्या झाल्याचा आरोप होता. दुहेरी हत्याकांडात नाव आल्यापासून सुवर्णा कोतकर फरार होत्या.सशर्त जामीन मंजूरकेडगावातील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाचा कट रचून त्याची अंमलबजावणी केल्याचा आरोप सुवर्णा कोतकरांवर आहे. अहमदनगर जिल्हा न्यायालयाने त्यांना अटी-शर्थींसह जामीन मंजूर केला आहे. महाराष्ट्र सोडायचा असल्यास परवानगी घ्यावी, पासपोर्ट जमा करावा, या अटींवर न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. सुवर्णा कोतकर या भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या ज्येष्ठ कन्या, तर माजी महापौर संदीप कोतकर यांची पत्नी आहेत.यापूर्वीही त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र तो फेटाळण्यात आला होता. दोन जानेवारीला पुन्हा त्यांनी जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सीआयडी आणि सरकारी वकिलांनी म्हणणे मांडले असता मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी झाली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सुवर्णा कोतकर यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.काय आहे प्रकरण?अहमदनगर महापालिकेच्या पोटनिवडणुकीनंतर 7 एप्रिल 2018 रोजी केडगाव मधील शाहूनगर परिसरात शिवसेना पदाधिकारी संजय कोतकर आणि शिवसैनिक वसंत ठुबे या दोघांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. कोतवाली पोलीस ठाण्यात या प्रकरणी 32 जणांवर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. यापैकी आठ जणांना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत होती. माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्यासह संदीप कोतकर, औदुंबर कोतकर या दोघा आरोपींचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचं तपासात समोर आलं होतं.मयत शिवसैनिकाच्या मुलाचा आरोप कायभानुदास कोतकर यांचा मुलगा संदीप कोतकर यांना हत्या प्रकरणात शिक्षा झाल्याने पोटनिवडणूक लागली होती. “पोटनिवडणुकीत शिवसैनिकांनी जोमाने प्रचार केला होता. पोटनिवडणुकीत संदीप कोतकरच्या चुलत भावाने विजय मिळवला. मात्र, त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. याचा बदला घेण्यासाठी माझ्या वडिलांची आणि वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली, असा आरोप मयत संजय कोतकर यांच्या मुलाने त्यावेळी केला होता.
Home महाराष्ट्र अहमदनगरमधील शिवसैनिकांची दुहेरी हत्या, कर्डिलेंची कन्या सुवर्णा कोतकरांना अटकपूर्व जामीन
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
थायरॉईड ह्या 5 पदार्थांनी खूप जोरात वाढतो?
मित्रांनो आपल्याला समजा थायरॉईड आहे. आणि त्यामध्ये हायपोथायरॉईड किंवा हायपरथायरॉईड कोणताही असो तुम्ही पाच वस्तू किंवा पाच पदार्थ जे आहेत ते बिलकुल...
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास 15 सप्टेंबर पर्यत मुदतवाढ
नांदेड (जिमाका) दि. 24 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील गुणवंत विद्यार्थ्यांनी...
RBI चा 2000 हजार रुपयांच्या नोटांबाबत मोठा निर्णय…
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) दोन 2000 हजार रुपयांच्या नोटांबाबत मोठा निर्णय घेतला...
GST : शेतकऱ्यांना जीएसटीचा जाच !
GST : नगर : सध्या शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय सर्वाधिक अडचणीत आला आहे. कधी नैसर्गिक आपत्तींचे संकट, तर कधी पिकाला...





