आज सकाळी 9 च्या सुमारास प्रियाचा मृतदेह नग्नावस्थेत आढळून आला. प्रियाच्या हाताची नस कापलेली होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पाठवला आहे. प्रियाचा 21 ऑक्टोबर 2021 रोजी अमर कांबळे या तरुणासोबत विवाह झाला होता.
विरार : विरारमध्ये मात्र 17 दिवसांपूर्वीच विवाह झालेल्या महिलेचा राहत्या घरात संशयास्पद मृतदेह सापडला आहे. हाताची नस कापलेली आणि नग्न अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. ही हत्या आहे की आत्महत्या हे अजून स्पष्ट झाले नसून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
प्रिया कांबळे असे मयत महिलेचे नाव असून ती विरार पूर्व कारगिल नगर परिसरात मानसी ज्वेलर्सच्या गलीत, तुळजाभवानी संकुल बिल्डिंग नंबर 6 मधील 303 या रूममध्ये राहत होती. आज सकाळी 9 च्या सुमारास प्रियाचा मृतदेह नग्नावस्थेत आढळून आला. प्रियाच्या हाताची नस कापलेली होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पाठवला आहे.
17 दिवसांपूर्वीच झाला होता विवाह
प्रियाचा 21 ऑक्टोबर 2021 रोजी अमर कांबळे या तरुणासोबत विवाह झाला होता. हा विवाह विरार पूर्व मनवेलपाडा येथील दत्त मंदिरात सर्वांच्या साक्षीने पार पडला होता. प्रियाचा पती खाजगी कंपनीत काम करत असून तो रात्रपाळीला कामावर गेला होता. पती रात्रीपाळीला गेल्यानंतर प्रिया रात्री घरी एकटीच असायची. सकाळी पती कामावरून घरी आल्यावर ही घटना उघड झाली आहे. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात मृतावास्थेत पाहून पती ही बेशुद्ध झाला. पतीनेच ही बातमी सोसायटीमधील राहिवाशांना सांगितल्यानंतर घटना उघड झाली आहे. मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच या घटनेचे नेमके कारण काय आहे हे स्पष्ट होईल. मयत महिलेच्या पतीची चौकशी सुरू आहे. प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शवविच्छेदन अहवालानंतरच हत्या की आत्महत्या स्पष्ट होईल
पोलिसांना ही माहिती कळताच विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांनी आपल्या टीम सह तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेऊन या घटनेचा तपास सुरू केला आहे. भाऊबीजसारखा आज पवित्र सण एकीकडे साजरा होत असताना, पती घरी नाही, लग्न होऊन फक्त 17 दिवस झालेले, नवीन संसाराचे स्वप्न फुलवत असताना विवाहितेचा राहत्या घरात नग्न अवस्थेत, हाताची नस कापलेला मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पाहून रहिवाशीही चक्रावून गेले आहेत. ही हत्या की आत्महत्या आहे. जर आत्महत्या आहे तर मृतदेह नग्नावस्थेत कसा असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले असून पोलीसांच्या अधिक तपासा नंतरच याचा उलगडा होणार आहे.




