अहमदनगर शहरातल्या सारसनगर परिसरात राहत असलेल्या साबळे आडनावाच्या व्यक्तीची दुचाकी (दि. ३०) रात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. साबळे यांनी भिंगार कँप पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि पोलिसांना योग्य रितीने तपास करता यावा, यासाठी सीसीटीव्ही फुटेजदेखील दिले. सीसीटीव्हीचे हे फुटेज पाहून भिंगार कँप पोलिसांनी सपोनि प्रविण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या काही तासांतच दुचाकीचोराला मुद्देमालासह (दुचाकी) जेरबंद केलं.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे पोलिसांच्या तपासकार्यातल्या अडचणी बहुतांशी कमी झाल्या आहेत. मात्र त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभ्यासाची तळमळ आणि फिर्यादीला लवकरात लवकर दिलासा देण्याची मानसिकता या सद्गुणांमुळे भिंगार कँप पोलिसांनी फिर्यादी साबळे यांना काही तासांतच त्यांची दुचाकी मिळवून दिली. सपोनि प्रवीण पाटील, पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे, पो ना. राजू सुद्रीक, पो कॉ. समीर शेख,पो. काँ. राहुल द्वारके आदींनी ही कामगिरी केली. साबळेंना मात्र भिंगार कँप पोलिसांचे आभार कसे मानावेत, हेच काही क्षण समजेनासं झालं. कारण दुचाकी चोरीला गेल्यामुळे त्यांच्या कामाचा खोळंबा होऊन संभाव्य आर्थिक नुकसान टळलं. त्यामुळे भिंगार पोलिसांच्या या कामगिरीचं साबळेंसह अनेकांनी कौतूक केलं.