अवघे साठ रुपये कर चुकवून धूम ठोकून पळण्याचा प्रयत्न : भिंगार कॅम्प पोलीसांची दंडात्मक कारवाई.

कॅन्टोन्मेंट हद्दीत अहमदनगर कँन्टोन्मेंट बोर्डाच्या मालकीचा प्रवेश पथकर नाका आहे. तसे अनेक ठिकाणी हे नाके आहेत. मात्र नगर – सोलापूर रोडवर टोल चुकवून भरधाव वेगात वाहन चालविण्याच्या घटना सातत्यानं घडत असतात.असाच एक प्रकार भिंगार कँप पोलिसांच्यालक्षात आला आणि अवघे साठ रुपये कर चुकवून धूम ठोकून पळण्याचा प्रयत्न करणार्‍या एका वाहन चालकाला या पोलिसांनी तब्बल एक हजार रुपयांचा दंड ठोकला.

या दंडात्मक कारवाईचा संबंधित वाहन चालकांनी चांगलाच धसका घेतला असून यामुळे मोठी खळबळ उडालीय.नगर मधून सोलापूर, जामखेड व पाथर्डी रस्त्यावर सतत प्रचंड अशी वर्दळ असते. परप्रांतियांच्या अवजड वाहनांसह जीप, एसटी, टेम्पो, डंपर्स, टँकर आदींसह दुचाकी वाहनांची या रस्त्याने नेहमी ये – जा असते.

कँन्टोन्मेंट बोर्डाच्या नाक्यावर अवघ्या साठ रुपयांच्या प्रवेश कराची पावती फाडण्याऐवजी वाहन चालक भरधाव वेगाने वाहनं दामटवून धूम ठोकतात. परंतू अशावेळी अपघात होऊन जिवित किंवा वित्तहानी होऊ शकते.यापूर्वी अशा डंपर्स आणि टँकर्सच्या धडकेनं अनेकांचे प्राण गेलेले आहेत. दुर्दैवानं हे वाहन चालक मागील अनुभवाचा किंवा घडलेल्या घटनांचा अजिबात गांभिर्यानं विचार करत नाहीत.

परिणामी या रस्त्यावर अपघातांच्या दुर्घटना थांबायचं नाव घेत नाहीत. वाहन चालकांच्या मुजोर प्रवृृृृृत्तीमुळे निष्पाप लोकांचे मात्र हकनाक जीव जात आहेत.असाच एक वाहन चालक साठ रुपयांचा कर चुकवून धूमस्टाईल जात असल्याचं भिंगार कँप पोलीस ठाण्याचे कर्मचारी रेवणनाथ दहिफळे यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी वाहनाचा लांबपर्यंत पाठलाग केला, ते वाहन अडवलं आणि सदर वाहन चालकाला त्यानं केलेल्या बेफिकीरीबद्दल त्याच्याविरुध्द एक हजार रुपये दंडाची कारवाई केली.

दरम्यान, महामार्गालगतच्या भरवस्तीत अवजड वाहनांचा वेग कमी करावा, अशा साध्या नियमांचा या वाहनचालकाला विसर पडतो आणि सामान्यांचा जीव टांगणीला लागतो. मुळामध्ये नगर – सोलापूर रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत. या खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं आणि हे खड्डे चुकविण्याच्या नादात दुचाकी वाहन चालकाचा मृृृृत्यू होतो.

त्यामुळे भिंगार कँप पोलिसांनी केलेल्या या दंडात्मक कारवाईने सामान्य दुचाकी वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळालाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here