
आमदार सत्यजीत तांबे यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- नाशिक पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी अहमदनगर शहरात आभार दौरा होता. याप्रसंगी ते शहरातील सर्वच पक्षातील मतदार व कार्यकर्यांचे आभार मानत असता मुकुंदनगर येथे भेट दिली असता मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करताना माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक समवेत हाजी.सय्यद वहाब, साजिद जहागिरदार शेख फारुख गुलाब आदीसह शिक्षक संस्थाचालक उपस्थित होते.
तसेच अल्पसंख्यांक व आदिवासी पदवीधर तरुणांसाठी एमपीएससी, यूपीएससी सेंटर अहमदनगरमध्ये सुरू करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करावा व अल्पसंख्यांक संस्थानांना व मुस्लिम समाजाच्या बहुल भागात निधी उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीचे निवेदन देण्यात आले. या सर्व गोष्टीला सकारात्मकता दाखवत आ.तांबे म्हणाले की अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक संस्थांना निधी उपलब्ध करून देणार व अल्पसंख्यांक संस्थानांना व मुस्लिम समाजाच्या बहुल भागात आमदार इमरान प्रतापगडी यांच्या निधीतून निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी आमदार तांबे यांचा सत्कार व शुभेच्छा देताना राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख, माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक, चाँद सुलताना हायस्कूलचे संचालक वाहब सय्यद, दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे वरीष्ठ उपसंपादक जी.एन. शेख, पत्रकार भैय्यासाहेब बॉक्सर, अजहर सय्यद, चिरागोद्दीन (पप्पूभाई) काझी, फकीरमोहम्मद तांबोळी, युवा नेते शहानुर जहागिरदार, सलमान जहागिरदार (भाऊसाहेब), बशीर शेख, शोएब अल्ताफ शेख, दानिश काझी, शेरअली तांबोळी, अब्दुल्ला कुरेशी, अमान शेख, फारूख शेख, प्रसाद शिंदे वैभव सांगळे समीर पठाण, जावळे पवार, रवी गावडे आदी शिक्षक संस्थाचालक उपस्थित होते.
