अल्पवयीन मुलीशी संगनमताने ठेवलेले शारीरिक संबंध POCSO अंतर्गत गुन्हा नाही; कोलकाता हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

अल्पवयीन मुलीशी संगनमताने ठेवलेले शारीरिक संबंध POCSO अंतर्गत गुन्हा नाही; कोलकाता हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

Calcutta HC : 16 वर्षाच्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याने एका व्यक्तीवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोलकाता उच्च न्यायालयाने त्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली आहे.

कोलकाता : अल्पवयीन मुलीशी तिच्या संमतीने एखाद्या पुरुषाने शारीरिक संबंध ठेवल्यास तो प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन अगेन्स्ट सेक्सुअल ऑफेन्स अॅक्ट (POCSO) म्हणजे पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा होत नाही असा महत्वपूर्ण निकाल कोलकाता उच्च न्यायालयाने दिला आहे. एखादी 16 वर्षाची मुलगी एखाद्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवताना ती अजान आहे असा समज करुन घेणं चुकीचं आहे, तिला आपण काय करतोय आणि त्याचे परिणाम काय होतील याची जाणीव असते असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. एका खटल्याची सुनावाणी करताना न्यायालयाने अशा प्रकारे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली. एका 22 वर्षाच्या मुलाने 16 वर्षाच्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर त्या मुलावर आयपीसी कलम 376(1) आणि पोक्सो कायदा कलम 4 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यावर त्या मुलाने कोलकाता उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यामध्ये सांगितलं होतं की, गुन्हा ज्यावेळी घडला अशी नोंद करण्यात आली होती त्यावेळी संशयित हा अल्पवयीन होता आणि त्या मुलीच्या संगनमताने त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. या प्रकरणी सुनावणी करताना न्यायमूर्ती सब्यासाची भट्टाचार्य म्हणाले की, “जर एखाद्या पुरुषाने अल्पवयीन मुलीशी संगनमताने शारीरिक संबंध ठेवले तर केवळ पुरुषाला जबाबदार धरता येणार नाही.”ही घटना 2017 सालची असून त्यावेळी 22 वर्षाच्या संशयितावर एका 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या केसमध्ये मुलगा आणि मुलगी या दोघांनीही संगनमताने शारीरिक संबंध ठेवल्याने केवळ मुलाला दोषी मानता येणार नाही असा निर्णय देत उच्च न्यायालयाने संबंधित मुलाला निर्दोष मुक्त केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here