अल्पवयीन मुलीवर अत्याचार करनाऱ्या मुलीच्या नातेवाईकांना त्वरित अटक करा – जन अदालत ची मागणी
. पुणे: ताडीवाला रोड ,पुणे येथील अकरा वर्षाच्या मुलीवर तिच्या कुटुंबातील व्यक्तींनी अत्याचार केल्याचे शाळेतील सम्पूदेशन द्वारे समोर आले आहे.
2017 पासून अत्याचार करणाऱ्या मुलीचे वडील , चुलत मामा , भाऊ यांना त्वरित अटक करावी अशी मागणी जन अदालत च्या महिला विभागा तर्फे बंड गार्डन पोलिस स्टेशन ला पोलीस निरीक्षक यांच्याकडे एका निवेदमाद्वारे करण्यात आली.
तपास अधिकारी योग्य तपास करून लवकरच इतर आरोपी गजाआड असतील असे आश्वासन शिष्टमंडळाला मिळाले.जन अदालत अशा महत्वाच्या आणि संवेदनशील प्रकरणात कायदेशीर मदत करण्यास तयार असल्याचे ही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
बंड गार्डन पोलीस स्टेशन ला निवेदन दिलेल्या शिष्टमंडळा मध्ये अँड राणी सोनवणे , अँड.शुभांगी भालेराव , अँड. शीतल काकडे, अँड सुवर्णा केदारे , अँड स्मिता वाघमारे , अँड वृषाली सूर्यवंशी , अँड अनुप्रीत कोळी , अँड राजश्री सूर्यवंशी , अँड अनुराधा घुगे , अँड क्षिप्रा धुंदी सहभागी झाले होते.