अर्पण ब्लड बँक मार्केट यार्ड येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले

815

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी अहमदनगर सीए शाखा व विद्यार्थी यांच्यावतीने अर्पण ब्लड बँक मार्केट यार्ड येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विद्यार्थी, सीए व अहमदनगरकरांनी सहभाग नोंदवला व एकूण ८० रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आयोजकांना यश आले असल्याचे अहमदनगर शहर सीए शाखेचे चेअरमन सीए संदीप देसरडा यांनी याप्रसंगी सांगितले.

या शिबिराचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी मर्चंट बँकेचे संचालक श्री संजयजी चोपडा, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. सचिनजी देसरडा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी कोरोना परिस्थितीत अतिशय योग्य वेळी केलेल्या आयोजनाचे कौतुक केले व राज्य शासनाच्या विविध योजनांबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीए किरण भंडारी यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी सीए शाखेचे चेअरमन सीए संदीप देसरडा, सीए परेश बोरा, सीए राजेंद्र काळे, सीए पवन दरक, अंकीत राका, पवन नागोरी, सुधांशु गोरे, अजित जरे, आनंद गांधी यांनी विशेष सहकार्य केले.

#BloodDonation #corona #coronaVirus #coronaUpdate #covid #Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here