अरणगावात पोलीस बंदोबस्त : झेंडा लावण्यावरून तणाव, पोलीस घटनास्थळी दाखल, परीस्थिती नियंत्रणात

अरणगावात झेंडा लावण्यावरून तणाव, पोलीस घटनास्थळी दाखल, परीस्थिती नियंत्रणात

अहमदनगर(प्रतिनिधी)- नगर शहराजवळ सोलापूर रोडवर असलेल्या अरणगाव इथे चौकात झेंडा लावण्यावरून दोन गटात वादावादी झाली. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली असल्याची चर्चा आहे.पोलिसांना ही माहिती मिळताच कोतवाली, तालुका, एमआयडीसी, तोफखाना पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी अरणगाव इथे धाव घेतली आणि परस्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळी नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील हे दाखल झाले.अरणगाव वाद झालेल्या ठिकाणी एक झेंडा अगोदर पासून होता त्या ठिकाणी अजून एक झेंडा लावला गेला, यातून दोन गटात वाद झाल्याची चर्चा आहे. तणाव वाढू नये म्हणून परिसरात पोलिसांनी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. सध्या परस्थिती नियंत्रणात असून तणाव निवळल्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here