काबुलमध्ये स्फोट करुन अमेरिकेच्या तेरा जवानांसह अनेक नागरिकांना ठार मारण्याचे कृत्य आयसिस – के या दहशतवादी संघटनेने केल्याचे बायडेन प्रशासनाने जाहीर केले. यानंतर अमेरिकेने ड्रोनद्वारे अफगाणिस्तानमध्ये ‘एअर स्ट्राईक’ केला. ‘एअर स्ट्राईक’ करुन आयसिस – के संघटनेच्या दहशतवाद्यांना लक्ष्य केल्याचे अमेरिकेने सांगितले. हल्ल्यात काबुलमध्ये स्फोट करण्याची योजना आखणारा आयसिस – के संघटनेचा दहशतवादी ठार झाल्याचे अमेरिकेने सांगितले. आयसिस – के ही दहशतवादी संघटना अफगाणिस्तानच्या नांगहार प्रांतात कार्यरत आहे. याच प्रांतात अमेरिकेने ‘एअर स्ट्राईक’ केला. ‘एअर स्ट्राईक’मध्ये किती दहशतवादी ठार झाले याची नेमकी आकडेवारी अद्याप अमेरिकेने जाहीर केलेली नाही. याआधी काबुल स्फोटात अमेरिकेच्या तेरा जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती अध्यक्ष बायडेन यांनी दिली. अमेरिकेच्या जवानांना लक्ष्य करणाऱ्यांना माफ करणार नाही, त्यांना शोधून त्यांची शिकार करू, असे बायडेन म्हणाले होते. अमेरिकेत वर्ल्ड ट्रेंड सेंटरच्या ट्विन टॉवरवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित असलेल्यांना माफ करणार नाही, त्यांना शोधून त्यांची शिकार करू; असे जाहीर केले होते. यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करुन लष्करी मोहिमेला सुरुवात केली होती. तब्बल दोन दशकानंतर ही मोहीम आवरती घेत अमेरिकेने अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया सुरू असताना काबुलमध्ये दोन स्फोट करुन अमेरिकेच्या जवानांसह अफगाण नागरिकांना लक्ष्य करण्यात आले. परदेशी पलायन करू इच्छिणाऱ्या अफगाण नागरिकांना मोठ्या संख्येने ठार करण्यात आले. स्फोटात अमेरिकेच्या तेरा जवानांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अमेरिकेने नांगहार प्रांतात ‘एअर स्ट्राईक’ केला.
ताजी बातमी
विक्रम राठोड यांनी स्व. अनिलभैय्यांशी गद्दारी केली…
आम्ही आजही मातोश्री आणि स्व. अनिलभैय्या राठोड यांचे निष्ठावान शिवसैनिकप्रतिनिधी : संपूर्ण हयात स्व. अनिलभैय्या राठोडयांनी मातोश्रीशी...
उध्दव ठाकरे म्हणतात…. तर फडणवीसांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडतील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना आपल्यासाठी उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'चे दरवाजे बंद केल्याचं भाष्य केलं...
आपटे ठरला एक दिवसाचा नगरसेवक… लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर आपटेंनी दिला राजीनामा; भाजप बॅकफूटवर
राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात सहआरोपी असलेल्या तुषार आपटे यांची भाजपाने बदलापूर कुळगाव...
चर्चेत असलेला विषय
नांदेड जिल्ह्यात 5 व्यक्ती कोरोना बाधित तर 4 कोरोना बाधित झाले बरे
नांदेड (जिमाका) दि. 31 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 873 अहवालापैकी 5 अहवाल कोरोना बाधित आले...
Pune Metro: “लोकं झोपेत असताना लपून छपून…”, पुणे मेट्रोवरुन भाजपचा शरद पवारांवर निशाणा
पुणे: आज पुण्यातील मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. तत्पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी या...
Coronavirus : चीन आणि युरोपीय देशांमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर, केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना...
Coronavirus Update : भारतातील कोरोना विषाणूचा संसर्ग सध्या आटोक्यात आला असून रुग्णवाढीचा आलेखही खूप कमी आहे. परंतु शेजारील चीन आणि युरोपमधील काही...
अनुष्का-विराटकडे ‘गुड न्यूज’
अनुष्का-विराटकडे 'गुड न्यूज'"आणि… आम्ही तीन होणार! जानेवारी 2021 मध्ये (बाळाचे) आगमन होणार" अशा आशयाचे ट्वीट अनुष्का शर्माने केले आहे.







