Russia Ukraine war : गेल्या सात दिवसांपासून रशिया युक्रेनमध्ये हल्ले करत आहे. युक्रेनमधील अनेक शहरांमध्ये मोठमोठ्या इमारती अक्षरश: अवशेषांमध्ये रुपांतरीत झाल्या आहेत. रशियन लष्कराने कीवमधील (Kyiv) टीव्ही टॉवरही उद्ध्वस्त केला आहे. दरम्यान, #IStandWithPutin ट्विटरवर टॉप ट्रेंडिंग आहे. भारतातील एक मोठा वर्ग रशियाच्या पारंपरिक मैत्रीचा हवाला देत उघडपणे त्याच्या समर्थनात उतरला आहे. अमेरिका (America) संधिसाधू आहे असे लोक म्हणत आहेत. संधी पाहून त्याने नेहमीच कोणाशीही हस्तांदोलन केले आहे, तर रशिया हा आपला खरा साथीदार आहे. त्यांनी भारताला प्रत्येक आघाडीवर साथ दिली आहे, असे सोशल मीडियावरील यूझर्सचे म्हणणे आहे. त्यामुळेच ट्विटरवर #IStandWithPutin या हॅशटॅगचा महापूर आला आहे. या हॅशटॅगद्वारे लोक रशियाला भारताचा खरा मित्र सांगत आहेत.
लोक कार्टून आणि मीम्स शेअर करत आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की हे अमेरिकेच्या फसवणुकीचे बळी ठरले, असे एका यूझरने म्हटले आहे. शंभरपट बलाढ्य रशियाशी दोन हात करण्यासाठी त्याला प्रवृत्त केले गेले आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. इतर देशांतील युद्धाचा संदर्भ देत लोकांनी अमेरिकेचा खरा चेहरा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पाहू या काही निवडक मीम्स…