अबब शेवगांव पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला गुन्हा दाखल

    84

    !!! पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती शेवगाव ज्ञानेश्वर सर्जेराव जाधव यांच्यावर पंचायत समिती कार्यालयाच्या जीवघेणा हल्ला शेवगांव पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल !!!

    या बाबत सविस्तर वृत्त असे कि फिर्यादी सरकारी लोकसेवक श्री. ज्ञानेश्वर सर्जेराव जाधववय 45 वर्षे धंदा पंशुधन विकास अधिकारी पंचायत समिती शेवगाव गणेश नगर शेवगांव यांच्या फिर्यादीवरून अनिस सय्यद रा नाईकवाडी मोहल्ला शेवगांव पुर्ण नाव माहिती नाही आणि अनोळखी दोन व्यक्ती यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा जबरी चोरी आणि जबर मारहाणीचा गुन्हा कला रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे. या बाबत आपल्या फिर्यादीत कथन करताना म्हंटले आहे कि दिनांक 20/04/2025 रोजी 10/00 वा. फिर्यादी डॉ जाधव पंचायत समीती आवारातील दत्त मंदिराचे दर्शन घेवुन मंदिरापासून आफिसकडे जात असतांना अनिस सय्यद हा जवळ येवुन म्हणाला की, मला प्रोटक्सन मनी (खंडणी) द्यावा लागेल लागेल त्यावेळेस फिर्यादीने त्यास स्पस्ट नकार दिला मी पहिल्या पासुन शेवगाव येथे राहण्यास आहे. त्यामुळे मी प्रोटक्सन मनी देवु शकत नाही.त्यानंतर दिनांक 22/04/2025 रोजी सांयकाळी 05/15 वा. सुमारास फिर्यादी त्यांच्या ऑफिस मध्ये असतांना तीन इसम 1. अनिस सय्यद रा. नाईकवाडी मोहल्ला शेवगाव ता. शेवगाव व त्याचे सोबत दोन अनोळखी इसम (नाव गाव महित नाही) असे ऑफिस मध्ये येवुन फिर्यादी डॉ जाधव यांना म्हणाले की, तुला सांगीतलेले पैसे तु का दिले नाही असे म्हणुन घाण घाण शिवीगाळ करुन कोणत्यातरी धारदार वस्तुने चेहऱ्यावर मारहाण करुन फिर्यादीच्या खिशातून 5000/-रुपये रोख रक्कम गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चैन बळजबरीने काढुन घेवुन दहशत निर्माण करून शिवीगाळ करून निघुन गेला. त्यानंतर फिर्यादी आणि ऑफीस मध्ये असलेले ईतर कर्मचारी मिळुन त्यास हाक मारुन माझे पैसे व सोन्याची चैन वापस दे असे म्हणालो असता तो मला म्हणाला की तुला काय करायचे ते कर मी तुला भित नाही असे म्हणुन तो निघून गेला. त्यानंतर फिर्यादी यांनी शेवगांव पोलीस स्टेशन गाठले तक्रार देण्यासाठी मला तोडाला मार लागला असल्याने शेवगांव पोलिसांनी पोलीसानी फिर्यादीला मेडिकल करण्या साठी ग्रामीण रुग्णालय शेवगाव येथे औषधउपचार घेवुन तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला वरील इसमा विरुध्द फिर्याद दाखल केली आहे. रात्री उशिरा फिर्याद संबंधितांच्या विरोधात विविध कलमान्वये डॉ. जाधव यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण होईल व माझ्या जीवितास धोका उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने शेवगांव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनखाली शेवगाव पोलीस अधिक तपास करीत आहेतताजा कलमशेवगांव पंचायत समितीचे काही विभाग पशु वैद्यकीय विभाग प्राथमिक शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास प्रकल्प अंगणवाडी जुन्या इमारतीत भारत असल्याने या भागात सि.सि. टीव्ही नसल्याने अश्या गैरप्रकारांना उत आला आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here