ठाणे: भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाणे डेपोमध्ये जाऊन एसटीची पाहणी केली. एसटी कामगार तासंतास अशा स्थितीत गाडी चालवतो. या लोकांनी एसटीची काय अवस्था केलीय, असा सवाल नितेश राणे यांनी केला. माझं आव्हान अनिल परब यांना आव्हान आहे की त्यांनी या सीटवर एक तास बसावं, मग कळेल की एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा काय असतात, असं नितेश राणे म्हणाले.
मी अनिल परब यांनी या सीटवर एक तास तरी बसून दाखवावं. विलीनीकरण केलं नाही तर आम्ही त्यांना या सीटवर बांधून ठेऊ, असं नितेश राणे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारचा तेरावा या सीटवर घालणार आहोत, असं नितेश राणे म्हणाले.
अजित पवार यांना विनंती आहे की त्यांनी चार पावलं पुढं येऊन या सीटवर बसून गाडी चालवून दाखवावी. गाडी चालवून दाखवावी आणि मग एसटी कर्मचाऱ्याचे प्रश्न सोडवावे की नाही, हे त्यांना कळेल, नितेश राणे म्हणाले.
एसटीची ही अवस्था असेल तर आणि राज्य सरकार मार्ग काढणार नसेल तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असं नितेश राणे म्हणाले. अनिल परब यांना मी इथं घेऊन येतो आणि त्यांना खुर्चीवर बसवतो. ही स्थिती पाहून ते विलीनीकरणाच्या प्रस्तावावर सही करतील, असं नितेश राणे म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत पुढील सुनावणी 20 डिसेंबर रोजी होणार आहे. आम्ही समितीसमोर आमची बाजू मांडली असल्याचं अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. आज आम्ही कोणतीही चुकीची घोषणा दिली नसल्याचं सांगितलं. आम्ही अहिंसक पद्धतीनं आंदोलन करत आहोत. एका कष्टकऱ्यानं एसटीवर दगड मारलेला नाही. 40 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्या पाहत्या न्यायालयानं आदेश पारीत करावा, असं सांगितल्याचं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. पुढील सुनावणीपूर्वी राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर मार्ग काढण्याचे आदेश दिल्याचं सदावर्ते यांनी सांगितलं.