अनिल कातकडे नगर शहराचे नवीन पोलीस उपअधीक्षक ; संदीप मिटके यांच्या जागी अनिल कातकड़े घेणारं पदभार
अहमदनगर – पोलिस दलातील पोलिस उपअधीक्षक पदाच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अहमदनगर शहर विभागाच्या पोलिस उपअधीक्षपदी अनिल अर्जुन कातकडे यांची बदली आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या उपअधीक्षकपदी कमलाकर जाधव यांची नियुक्ती झाली आहे.आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अंबादास भुसारे यांची नाशिक शहराच्या सहाय्य आयुक्तपदी पदोन्नतीवर बदली झाली आहे. नारायण न्याहळदे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक अतिरिक्त पोलिस अधीक्षकपदी पदोन्नतीवर बदली झाली आहे.





