अदानी पाठोपाठ रामदेव बाबा यांच्या ‘पतंजली’ला मोठा झटका! गुंतवणूकदारांना आतापर्यंत सुमारे ७००० कोटी रुपयांचे नुकसान .

    316

    Share Market Patanjali : बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड्स कंपनीचा स्टॉक दिवसेंदिवस खाली येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या 1 आठवड्यापासून पतंजली फूडचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत.

    कंपनीत पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत सुमारे 7000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेअर्स आणखी खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आणखी तोटा सहन करावा लागू शकतो.

    3 फेब्रुवारी रोजी लोअर सर्किट बसवण्यात आले :3 फेब्रुवारी रोजी पतंजली फूड्सच्या शेअर्समध्ये लोअर सर्किट झाला. शेअर्स 903.35 च्या किंमतीपर्यंत खाली आणले होते. ट्रेडिंगच्या शेवटी, शेअरची किंमत 906.80 रुपये होती, जी 1 दिवसापूर्वीच्या तुलनेत 4.63 टक्क्यांनी घसरली आहे. त्याच वेळी, कंपनीचे बाजार भांडवल 32,825.69 कोटी रुपये आहे. 27 जानेवारीला शेअरची किंमत 1102 रुपयांच्या पातळीवर होती. बाजार भांडवल सुमारे 40,000 कोटी रुपयांच्या पातळीवर होते.आठवडाभरात बाजार भांडवल 7000 कोटी रुपयांनी खाली आले आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे.
    हेही वाचा: अर्थभान : शेअरवरील परतावा मोजता का?

    तिमाही निकाल जाहीर :पतंजली फूड्सने 31 डिसेंबर 2022 रोजी तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने 15% वाढीसह 269 कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. तर 1 वर्षापूर्वीच्या नफा 234 कोटी रुपये होता.
    पतंजली फूडचा महसूल 26 टक्क्यांनी वाढून 7,929 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. 1 वर्षापूर्वी महसूल 6,280 कोटी रुपये होता. पतंजली फूड्सचे शेअर्स किती दिवस असेच राहतील हे सांगणे कठीण आहे.हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब…गुंतवणूकदार चिंतेत :जसजसा शेअर बाजार खाली येत आहे. दिवसेंदिवस गुंतवणूकदारांची चिंताही वाढत आहे. मोठ्या संख्येने लोकांनी पतंजलीचे शेअर्स खरेदी केले आहेत. सध्या शेअर बाजारात मोठी उलथापालथ सुरू आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here