
ज्येष्ठ अभिनेते, समीक्षक, प्राध्यापक माधव वझे यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले आहे, ते ८६ वर्षांचे होते. १९५३ सालच्या श्यामची आई चित्रपटातून माधव वझे यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांच्या या भूमिकेचे खूप मोठे कौतुक झाले होते. यानंतर त्यांनी बालकलाकार म्हणून काही मोजके चित्रपट केले. बापजन्म, 3 इडिअट्स, डिअर जिंदगी, एवढंस आभाळ अशा हिंदी, मराठी चित्रपटात ते झळकले. हॅम्लेट या नाटकाचे त्यांनी दिग्दर्शन देखील केले होते. पुण्याच्या वाडिया कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले होते. प्रायोगिक रंगभूमी, रंगमुद्रा, श्यामची आई आचार्य अत्रे आणि मी, नंदनवन अशी पुस्तकं त्यांनी लीहीली आहेत.