अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कुणी नेमलं? त्यांना पाठिंबा कुणी दिला? त्याचे काही पुरावे आहेत का? असे प्रश्न आज शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड बोलत होते.२ जुलैला अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर ३ जुलैच्या दिवशी शरद पवार आमचे अध्यक्ष आहेत असं म्हटलं होतं. मग अजित पवार हे अध्यक्ष कसे काय झाले? असा प्रश्नही जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. ३० जून रोजी अजित पवार गटाने आम्ही बैठक घेतली आणि अजित पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाहीर केलं असं सांगितलं. अशी कुठलीही बैठक झाली नाही. याबाबत विचारलं असता असं कळलं की फोनवरुन बैठक झाली. अशा बैठका कधीही फोनवरुन होत नसतात.
संगमनेर: शिक्षण (Education) हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असून गोरगरीब, आदिवासी, शेतमजूर यांच्या मुलांचा शिक्षणाचा हक्क शासन चुकीच्या धोरणातून हिरावून...
Bengaluru : भारतात ओमिक्रॉन प्रकारातील दोन कोविड-19 प्रकरणे आढळून आली आहेत, आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, जागतिक चिंता निर्माण करणाऱ्या कोरोनाव्हायरसच्या ताणाची...