परवानगी नाकारली होती मात्र तरीही हा कार्यक्रम आयोजित करण्याचा आगाऊपणा या मंडळांनी केला.याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गौतमी पाटीलच्या नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजक असलेले मृत्युंजय प्रतिष्ठान गुलमोहर रोड आणि एकदंत मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल सांगळे, आनंद कैलास नाकाडे, हर्षल किशोर भागवत या पदाधिकाऱ्यांसह नृत्यांगना गौतमी पाटील आणि तिचा स्वीय सहाय्यक अशोक खरात या सर्वांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.रहदारीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रस्त्यावरच कार्यक्रम घेणं, ध्वनीक्षेपका बाबत सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटी आणि शर्तींचं उल्लंघन करणं, डीजेवर करणकर्कश आवाजात गाणी लावून ध्वनी प्रदूषण करणं, वारंवार डीजेचा आवाज कमी करण्याच्या सूचना देऊनही त्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल या सर्वाविरुद्ध भादंवि कलम 188, 283, 341, 34 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम






