मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई नियामक मंडळाची सभा दि.६ ऑक्टोबर २०२१ रोजी. यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त मा. श्री.शरद पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. महाराष्ट्र राज्याचे मंत्री ना.ऊदय सामंत, विश्वस्त श्री. शशी प्रभू यावेळी उपस्थित होते.
सदरील सभेत सहकार्यवाह म्हणून मला कामकाज पाहण्याची व बोलण्याची संधी मिळाली हीच माझ्या कामाची पावती असे सतीश लोटके यांनी यावेळी सांगितले.
यासभेत नाट्य परिषद व नाट्यचळवळीविषयक महत्वपूर्ण योजना आखण्याचा निर्णय घेण्यात आला. नाट्य परिषदेची नाट्य विषयक शैक्षणिक कला अकादमी, नाट्य परिषदेच्या सर्व शाखांचे आर्थिक व नवीन योजनांसह सक्षमीकरण करण्यात येणार आहे. तसेच नाट्य परिषदेच्या यशवंत नाट्य संकुलाची दुरूस्ती लवकर करण्यात येईल व नाट्य परिषदेच्या कामकाजासाठी भरीव राखीव निधी राज्य सरकारच्या व इतर माध्यमातून करण्यात येईल असे मा. शरद पवार साहेबांनी कालच्या सभेत जाहीर केले.
या सभेत नाट्य परिषदेचे विश्वस्त म्हणून ना.उदय सामंत, श्री. मोहन जोशी, श्री. अशोक हांडे, श्री. गिरीश गांधी यांची निवड करण्यात आली. या सर्व नवनिर्वाचित विश्वस्तांचे अभिनंदन.?
सतीश लोटके
सहकार्यवाह
अ.भा.म.नाटय परिषद, मुंबई