देवदर्शन करुन परतणाऱ्यांवर काळाचा घाला! अक्कलकोट-गाणगापूर रोडवर भीषण अपघात, 5 जण जागीच ठार
MH 16 BH 5392 असा गाडीचा नंबर
सोलापूर : अक्कलकोट-गाणगापूर रोडवर कारचा भीषण अपघात झाला आहे.
या अपघातामध्ये 04 महिला आणि 01 चालक असे एकूण 05 जण जागीच ठार झालेत.
अहमदनगरहून गाणगापूरला दर्शनासाठी गेले होते. गाणगापूरहून परत अहमदनगरला परतत असताना चालकाचा गाडीवरून ताबा सुटल्याने हा अपघात झाला.
या अपघातात गाडी झाडावर आदळली आणि पाच जण जागीच ठार झालेत. अपघातातील पाचही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्नाटकातील (Karnataka) अफझलपूर शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. कर्नाटकातील अफझलपूर पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.
अक्कलकोट गाणगापूर रोडवर बळोरगी जवळ हा अपघात झाला.कारचा चक्कचूर!MH 16 BH 5392 असा गाडीचा नंबर आहे.
शिकाऊ चिन्ह असलेलं ‘L’ असं देखील गाडीच्या मागच्या काचेवर दिसून आलं आहे. डॅटसन गो प्लस या गाठीतून हे सर्वजण प्रवास करत होते.
दरम्यान, गाडीनं समोरच्या बाजूनंच झाडाला धडक दिली आणि यात कारचा चक्काचूर झालाय. तर गाडीतील पाच जणांना जबर मार लागून त्यांचाही जागीच मृत्यू झाला आहे.अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनीच घटनास्थळी धाव घेतली.
यानंतर स्थानिकांनी गाडीतील मृतदेह बाहेर काढलेत. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. तर एक पुरुष चालकाचाही मृत्यू झाला आहे.रक्तबंबाळ अवस्थेत गाडीतच प्रवाशांचे मृतदेह अडकून पडले होते. तर गाडी रस्ता साडून एका बाजूला कलंडली होती.
गाडीच्या मागच्या आणि पुढच्या दोन्ही काचा फुटल्या होत्या. दरम्यान, आता पोलिस या अपघाताबाबत अधिक तपास करत आहेत. सध्या अपघातातील सर्व मृतदेह हे शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
बाबासाहेब सखाराम वीर, कोमल बाबासाहेब वीर, राणी बाबासाहेब वीर, अणव हिराबाई, छाया बाबासाहेब वीर असे मृत झालेल्या प्रवाशांचे नावे आहेत.
तर साहिली बाबासाहेब वीर,त्राली दिनकरा सुरवशी गंभीर जखमी झाले.कारमधील सर्वजण मृत्युमुखी पडल्याने व दोन जण वाचलेले गंभीर जखमी असल्याने अहमदनगरवरून नातेवाईक निघाले आहेत.