अँट्रॉसिटीतून शिक्षकाची निर्दोष मुक्तता: बारामती विशेष सत्र न्यायालयाचा निकाल.

अँट्रॉसिटीतून शिक्षकाची निर्दोष मुक्तता बारामती विशेष सत्र न्यायालयाचा निकाल.

बारामती, शाहू हायस्कूल येथील चित्रकला शिक्षकाची अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच बाल लैंगिक शोषण कायदा कलम ७, १२ च्या आरोपातून बारामती येथील विशेष सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. ए. शहापूरे यांनी निर्दोष मुक्तता केली.

बारामती येथील एका शाळेत ६ फेब्रुवारी २०१४ मध्ये चित्रकलेच्या वर्ग सुरू असताना अल्पवयीन मुलीसोबत तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याचा शिक्षकावर आरोप होता. याबाबत बारामती येथील विशेष सत्र न्यायालयात सुनावणी सुरु होती.

आरोपी विरुद्ध सरकारी पक्षाने पीडित मुलीचे वडील, पीडित मुलगी, तिची मैत्रीण तसेच तपास करणारे पोलीस अधीक्षक संभाजी कदम यांची साक्ष नोंदवली. तर आरोपी तर्फे *अ‍ॅड. विशाल बर्गे* यांनी काम पाहिले.

आरोपीच्या वकिलांनी साक्षीदारांची उलट तपासणी केली. त्यात पीडित मुलगी, तिची मैत्रीण, पंच हे सगळे एकमेकांचे नातेवाईक असून एकाच समाजाचे आहेत.

पोलीस अधीक्षक यांनी संबंधित शाळेतील एकाही महिला साक्षीदाराचा जबाब नोंदवून घेतला नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

साक्षीदारांच्या जबाबात तफावत

पीडित मुलीने मुख्याध्यापक, महिला वर्गशिक्षक यांनाही या गुन्ह्यांबाबत तत्काळ कळवले नाही. आरोपीने जातीवाचक शिवीगाळ केल्याबाबत सरकारी साक्षीदारांच्या जबाबात तफावत असून त्यावर अजिबात विश्वास ठेवता येणार नसल्याचे आरोपीचे वकील *अँड . विशाल बर्गे* यांनी युक्तिवाद करताना सांगितले.

चिडून दिली होती खाेटी

फिर्याद आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला चित्र काढले नाही म्हणून कडक शिक्षा दिली होती. त्यामुळे पीडित मुलगी आणि तिचे पालक चिडून होते.

त्यातूनच त्यांनी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, संघटना यांना हाताशी धरून शिक्षकाविरुद्ध खोटी फिर्याद दिल्याचे *अँड विशाल बर्गे* यांनी न्यायायात सिद्ध केले.

दोन्ही बाजूचा युक्तिवाद एकूण घेतल्यानंतर विशेष न्यायाधीश शहापूरे यांनी आरोपी शिक्षकाची विनयभंग आणि अँट्रॉसिटीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here