? अल्टोला येणार आता एसयूव्ही लुक; पाहा का आहे खास..
? मारुती सुजुकीची अल्टो पहिल्यांदा सप्टेंबर 2000 मध्ये लॉंच झाली होती आणि 2004 मध्ये अल्टो देशात सर्वाधिक विकली जाणारी कार झाली आणि मागील 16 वर्षांपासून मारुती सुजुकी अल्टो बेस्ट सेलिंग कार आहे.
? नवीन अल्टो नेक्स्ट जनरेशन कार असेल. नवीन लुक एसयूव्हीप्रमाणे स्टाइलिश असू शकतो. यात अपडेटेड बंपर, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि रिवाइज्ड हेडलँप्स दिले जाऊ शकतात. याच्या इंजिनमध्ये देखील बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
? सध्याची अल्टो-
▪️ अल्टो बीएस-6 नॉर्म्स, 796 सीसी च्या 3 सिलेंडर इंजिनसह
▪️ सुरुवाती किंमत- 2,94,800 रुपये
▪️ पेट्रोल व्हेरिएंट मायलेज- 22.05 किमी प्रती लीटर
▪️ सीएनजी व्हेरिएंट मायलेज- 31.50 किमी प्रती लीटर
??♂️ आतापर्यंत अल्टोची 40 लाख युनिट विक्री झाल्यामुळे मागील महिन्यात या कारच्या नावावर रेकॉर्ड तयार झाला आहे. सोपे ऑपरेशन्स, चांगलं मायलेज, लो मेंटेनन्समुळे अल्टो नेहमीच ग्राहकांची पसंत राहिली. आता पुन्हा मारुती आपल्या या आवडत्या गाडीला नवीन लुकमध्ये लॉंच करायची तयारी करत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖