‘ह्या’ तालुक्यात ढगफुटी; मंदिरही गेले पाण्याखाली
अहमदनगर : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात काही भागात वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला.
काळ (सोमवार) पारनेर तालुक्यामध्ये अनेक भागांत ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने परिसर जलमय झाल्याचे पाहायला मिळाले.
पारनेर शहर, हंगा, शहाजापुर, वडनेर, लोणी हवेली, व परिसरामध्ये मुसळधार पाऊस तर काही भागांमध्ये ढगफुटी सारखा प्रकार झाला. त्यामुळे परिसरातील ओढे नाला नदी यांना मोठ्या स्वरूपामध्ये पूर आला होता.
तसेच शेतीचे बर्याच ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यामध्ये अनेक दिवसापासून पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे शेतकरी हैराण झाला आहे.