हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार मालक सावधान, अन्यथा कायमचा होईल परवाना रद्द
तसंच, दुसऱ्यांदा नियमांचं उल्लंघन केल्यास हॉटेल परवाना काही दिवसांसाठी निलंबित आणि जर तिसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन झाल्यास हॉटेल व्यवसायाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू आहे का, प्रवेश करण्याच्या ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था, थर्मलद्वारे शरीराचे तापमान तपासणे, हवा खेळती, आवश्यक ते सामाजिक अंतर, डिजिटल पेमेंटला प्राधान्य, चांगल्या प्रतीचे पेपर नॅपकीन, वारंवार निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आदी मार्गदर्शक सूचना शासनाने दिल्या आहेत.
या मार्गदर्शक सूचनांचे पालन होतं की नाही, यावर लक्ष ठेवण्याबरोबच नियमांच्या अंमलबजावणीचे काम विशेष पथक करणार आहे. शहरामधील पथकामध्ये मनपाचे कर्मचारी, उत्पादन शुल्कचे अधिकारी आणि पोलीस यांचा समावेश असणार आहे. तर, ग्रामीण भागात महसूल आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.
मुंबई पालिकेचे हॉटेल्ससंदर्भातील काही नियम
– मुंबईत हॉटेल्समध्ये टेबलाचे प्री-बुकिंग आवश्यक
– ठराविक संख्येपेक्षा जास्त ग्राहक एकावेळेस हॉटेलमध्ये येण्यास परवानगी नाही
– दोन टेबलमध्ये कमीत कमी 2 ते 3 फुटांचे अंतर आवश्यक
– टेबल आणि किचनची वेळोवेळी स्वच्छता करणं गरजेचं
– हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची वेळोवेळी वैद्यकीय चाचणी आणि कोविड टेस्ट करणं बंधनकारक