हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश!

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आणि शरीरात उष्णता टिकवण्यासाठी उबदार कपडे घालण्यासोबतच आहाराकडे लक्ष देणेही गरजेचे असते.

आहारात योग्य ते बदल केल्याने शरीराला आवश्यक असलेली उष्णता मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते.

आहारात ‘हे’ बदल करा..

सुका मेवा – सुकामेव्यामुळे शरीराला ऊर्जा निर्माण होते आणि आवश्यक ती उष्णताही मिळते. सुकामेवा उष्ण प्रकृतीचा असल्याने इतर ऋतूत त्याचा वापर जपून करावा लागतो. मात्र, हिवाळ्यात सुकामेवा खाणे फायदेशीर असते.

गावरान तूप – शुद्ध तुपात अनसॅच्युरेटेड फॅट असतात. ते शरीराला नैसर्गिकरित्या ऊर्जा देतात आणि निरोगी राहण्यास मदत होते. तसेच हिवाळ्यात येणारी सुस्ती घालवण्यासाठीही तुपाचा उपयोग होतो.

फळभाज्या – हिवाळ्यात गाजर, मुळे, बटाटे, कांदा आणि लसूण यांचा आहारात समावेश केल्यानेही फायदा होतो. तसेच हे पदार्थ पचायला हलके असून शरीरात उष्णता निर्माण करतात.

मध – हिवाळ्यात गोड पदार्थांमध्ये साखरेएवजी मधाचा वापर करावा. सकाळी लिंबूपाण्यासह मध घेण्याचेही अनेक फायदे आहेत. तसेच सलादवरही मध टाकून घेतल्यास त्याचा स्वाद वाढवता येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here