नगर : स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे जिल्हा संघटक म्हणून सय्यद अजहर मुस्ताक यांची नियुक्ती संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी केली. अजहर हे वृत्तपत्रछायाचित्रकार आणि न्यूज कॅमेरामन म्हणून कार्यरत आहेत. उदयोन्मुख पत्रकार अजहर यांनी नगर शहरासह जिल्ह्यात संपर्क करुन या पत्रकार संघाचे संघटन मजबूत करावे अशी अपेक्षा वरिष्ठ संपर्क प्रमुख अफसर शेख यांनी अजहर यांना नियुक्ती पत्र देतांना व्यक्त केली.
पत्रकारितेचा धर्म पाळतांना संघटनेचा उद्देश सफल करण्याचा प्रयत्न करु, असे अजहर यांनी ग्वाही दिली. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.






