सोनईतल्या युवकाने केली आत्महत्या! घरातल्या पंख्याला गळफास घेत संपविली जीवनयात्रा!

सोनईतल्या ‘या’ युवकाने केली आत्महत्या! घरातल्या पंख्याला गळफास घेत संपविली जीवनयात्रा!

येथील दतात्रय जगन फुलारे ( वय – ३५ रा. अंबिकानगर, सोनई, ता. नेवासा, जि. अ. नगर) या युवकाने आज (दि. २०) घरातल्या पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली.

आत्महत्येचं कारण समजू शकलं नसल्याचं सोनई पोलिसांनी सांगितलंय. याप्रकरणी पांडूरंग शिंदे यांच्या खबरेवरुन अकस्मात मृृृृत्युच्या घटनेची नोंद करण्यात आली.

घटनेची माहिती समजताच सपोनि करपे आणि अन्य पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.  पंचनाम्यानंतर मयताचा मृृृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

दरम्यान, आत्महत्येच्या या घटनेवरुन अंबिकानगर परिसरात उलटसुलट चर्चेला खूपच उधाण आले. घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here