सोनईचे मनोज वाघ यांचं अकाली निधन!
सोनईचे माजी सरपंच स्व. सखाराम मामा वाघ यांचे सुपुत्र आणि तरुणांसह अबालवृृृध्दांची आस्थेवाईकपणे विचारपूस करुन गरजवंतांना सदैव मदतीचा हात देणारे मनोज वाघ यांचं काल (दि. २०) रात्री निधन झालं. ते ३६ वर्षांचे होते.
त्यांच्यावर नगर, पुणे आणि मुंबई येथील रुग्णालयांत उपचार करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. कोरोनामुळे त्यांचं फुफ्फुस निकामी झाल्याचं सांगितलं जात होतं.
मनोज वाघ यांचा मित्र परिवार मोठा होता. वडिल स्व. सखाराम मामा वाघ यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांची राजकीय वाटचाल सुरु होती. अनेकांना मदतीचा हात देण्याच्या सत्प्रवृृत्तीमुळे मनोज वाघ सर्वांना सुपरिचित होते.
त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, आई, पुतणे, भाचे असा मोठा परिवार आहे. मनोज वाघ यांच्या अकाली निधनामुळे सोनई आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.