सायबर क्राईमचा नवीन पैलू: विवाह विषयक संकेतस्थळावर होणारी फसवणूक
जनतेने कोणत्याही विवाहस्थळांच्या साईटवर बायोडाटा अपलोड करतांना सदरची साईट खरी आहे का हे तपासुनच अपलोड करावे.
ही फसवणूक खालील प्रकारे केली जाते..
१.खोट्या संकेतस्थळावर अनोळखी हाय प्रोफाइल परदेशी व्यक्तीकडून मागणी येते.
२.सदरची व्यक्ती स्वतः येत असल्याचे सांगून किंवा महागडे गिफ्ट पाठवून ते कस्टम मध्ये अडकले असून ते सोडवण्यासाठी वारंवार पैशाची मागणी केली जाते व हे पैसे अनोळखी बँक खात्यात जमा करण्यास सांगितले जाते.
३.अशा वेबसाईटवर लग्न करण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या कारणांनी पैशांची मागणी केली जाते व अनोळखी खात्यांवर हे पैसे अनोळखी बँक खात्यात जमा करण्यास सांगितले जाते व पैसे घेऊन ती व्यक्ती लंपास होते. ज्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येतात ते बँक खाती खोटी असतात.
४.याच कारणाने ओळख वाढवून वैयक्तिक माहिती अथवा फोटो ची देवाणघेवाण करून ब्लॅकमेल केले जाते व आर्थिक फसवणूक ही केली जाते.
• हा मेसेज आपल्या गावाकडील कमी शिक्षित लोकांपर्यंत पोहोचवा, जेणे करून आपली फसवणूक होणार नाही व मेहनतीने कमविलेला पैसा सुरक्षित राहील
आपली फसवणूक झाल्यास, त्वरित आपल्या जिल्ह्यातील सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधा. १२ तासाच्या आत पोलिसांना कळविल्यास आपले फसवणूक झालेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.
व्रजेश गुजराथी (सायबर क्राईम अनालिस्ट व सीसीटीव्ही फुटेज तज्ञ)