** सातारा दि. 12 (जिमाका): जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कोणताही रुग्ण बेडपासून वंचित राहणार नाही यासाठी जिल्ह्यातील ऑक्सिजन बेडची व व्हेंटेलेटरची संख्या वाढवा, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज कोरोना संसर्गाचा आढावा गृह (ग्रामीण) राज्यमंत्री श्री. देसाई यांनी घेतला यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहता रेमडेसिवीर औषधांचा अधिकचा पुरवठा जिल्ह्यासाठी व्हावा यासाठी शासनाला पत्र द्या, अशा सूचना करुन गृह राज्यमंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले, सध्या जिलह्यात 3 हजार ऑक्सीजन बेड व 200 व्हेंटेलेटर आहेत. भविष्याचा विचार करुन ऑक्सिजन बेड व व्हेंटेलेटरची संख्या वाढवली पाहिजे. शासनाने लॉकडाऊन किंवा आणखीन कडक निर्बंध जाहीर केले तर त्यांच्या अंमलबजावणीसाठी गृह विभागाने मनुष्यबळ तयार ठेवावे. तसेच नागरिकांनी मास्कचा, वेळोवेळी सॅनिटायझरचा, सुरक्षित अंतर याचे पालन केले पाहिजे याबरोबरच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे, असे आवाहनही गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शेवटी केले.0000
ताजी बातमी
आईच्या जातीच्या आधारावर जात प्रमाणपत्र मिळू शकत का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
Supreme Court Decision : आपल्याकडेवडिलांची जी जात तीच मुला-मुलींची जात अशी रूढी आहे अन कायद्यात सुद्धा अशा...
Gold- Price: मोठी अपडेट समोर ! भविष्यात १० ग्रॅमचा सोन्याचा भाव थेट दीड लाखांच्या...
सोने आणि चांदी या दोन मौल्यवान धातूंचा भाव कधी वाढताना दिसतोय. तर कधी या दर्दान धातूंमध्ये मोठी...
गुंतवणूकदारांचीफसवणूक करणारा रिलायबल ग्रुपचा मोहरक्या सात वर्षांनंतर जेरबंद
अहिल्यानगर-रिलायबल ग्रुप ऑफ कंपनीच्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक करणारा कंपनीच्या मोहरक्याला ना तब्बल सात वर्षांनंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
चर्चेत असलेला विषय
“किंमत द्यायला तयार”: पक्षनेत्याच्या प्रश्नावर शरद पवार
मुंबई: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी केली असता, पक्षप्रमुख शरद पवार यांनी सोमवारी...
संगमनेरमध्ये ईव्हीएम स्ट्रॉग रूमचे सीसीटीव्ही कॅमेरे अचानक बंद ! संगमनेरकरांमध्ये संताप, नेमकं काय घडलं!
संगमनेर: संगमनेर पालिकेसाठी मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या 'स्ट्रांग रूम'वरील सीसीटीव्ही कॅमेरे आज, रविवारी अचानकपणे काहीवेळासाठी...
उच्च स्तरीय समितीच्या अहवालावर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अभिप्रायावर त्यांची स्वाक्षरी का नाही?, हायकोर्टाचा...
मुंबई : वेतन, एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण आदी मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारीही ठोस तोडगा निघालेला नाही....
अहमदनगर येथील युवकावर ब्लेडने वार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
अहमदनगर-घरात झोपलेल्या मुलावर ब्लेडने वार करून त्याच्या पाकिटामधील दोन हजारांची रक्कम लुटली. रविवारी (दि. 3) रात्री साडे...




