सराईत वाहन चोरांस क्राईम ब्रँच युनिट दोन कडून अटक
पुणे : क्राईम ब्रँचचे पोलिस कर्मचारी शहरात गस्त असताना वाहन चोरांची गोपनीय माहिती पोलिस नाईक मोहसीन शेख यांना बातमी दारामार्फत मिळाली त्यानुसार त्यांनी हॉटेल सम्राट जवळ सापळा रचून त्यास ताब्यात घेतले
आरोपी विशाल संजय वाघमारे रा. डांगे चौक, वाकड याचाकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याने हिरो होडा स्प्लेंडर शिक्रापूर पोलीस स्टेशन च्या हद्दीतून चोरल्याची कबुली दिली
त्याचे दोन साथीदार गर्दीचा फायदा घेऊन पळून गेले
वाढत्या घटना लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी गुन्हे शाखेच्या कर्मचारी यांना वाहन चोरी घटनेची उकल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार क्राईम ब्रँच युनिट दोन चे कर्मचारी हद्दीत गस्त घालत असताना पोलिस नाईक मोहसीन शेख, चंद्रकांत महाजन यांना बातमीदारांकडून सराईत वाहन चोर विजय उर्फ तेजस जाधव हा ससून रुग्नालयाजवळील पार्किंग परिसरात फिरत असल्याची व बातमी मिळाल्या नंतर त्याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले
6 महिन्यापूर्वी इतर 2 साथीदारांसह तळेगाव ढमढेरे येथून हिरो होंडा स्प्लेंडर चोरल्याची कबुली दिली. तपासात त्याचे ताब्यातून हिरोहोंडा एकूण किंमत रुपये 20,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.शिक्रापूर पोलीस स्टेशन 549/2020 IPC 379 हा गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यास पुढील कारवाईकामी मेडिकल करून शिक्रापूर पो.स्टे.(पुणे ग्रामीण) चे ताब्यात देण्यात आले आहे.
अप्पर पोलिस आयुक्त अशोक मोराळे उप आयुक्त बच्चन सिंग सहाय्य्क आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदशनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप सहाय्य्क पोलीस निरीक्षक जयंत जाधव, उपनिरक्षक प्रतापसिंह शेळके, सहायक फौज यशवंत आम्रे, अनिल उसूलकर, किशोर वग्गू, अस्लम पठाण, मोहसीन शेख, चंद्रकांत महाजन, गोपाळ मदने यांच्या पथकाने कारवाई केली