सतीश चव्हाण यांचा रिकॉर्ड ब्रेक विजय:औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून महा विकास आघाडीचे उमेदवार मा.आमदार सतीश चव्हाण यांना एक लाख 16 हजार 638 तर भाजपाचे उमेदवार श्री शिरीष बोराळकर यांना 58 हजार 743 मते पडली.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून महा विकास आघाडीचे उमेदवार मा.आमदार सतीश चव्हाण यांना एक लाख 16 हजार 638 तर भाजपाचे उमेदवार श्री शिरीष बोराळकर यांना 58 हजार 743 मते पडली.

विजयी उमेदवारासाठी 1 लाख 9 हजार 409 मताचा कोटा निश्चित करण्यात आला होता. या निवडणुकीत एकूण दोन लाख 41 हजार 908 मतदार बांधवांनी मतदान केले होते. त्यापैकी 23092 मध्ये बाद झाली. पहिल्याच पसंतीच्या मतावर श्री आमदार सतीश चव्हाण यांनी निवडून येण्याचा कोटा पूर्ण केल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांना मिळालेले मताधिक्य हे 57 हजार 895 आहे. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघातील हा विजय रेकॉर्डब्रेक विजय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here