कोरोनामुळे मागील सहा महिन्यांपासून घालण्यात आलेले अनेक नियम टप्प्या टप्प्यांमध्ये शिथिल केले जात आहे. सध्या सरकारने अनलॉक 4 अंतर्गत अनेक गोष्टींसाठी परवानगी देत अर्थव्यवस्थेचा चालना देण्यासंदर्भात काही निर्णय घेत उद्योग व्यवसाय सुरु करण्यास सूट दिली आहे.
देशातील विविध भागांमध्ये वेगवेगळे सण साजरे होत आहेत. त्यापार्श्वूमीवर अनेक गोष्टींना सूट मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे .महिन्यामध्ये गृह मंत्रालयाने काही गोष्टींमध्ये सूट देत असल्याचे सांगत. सणासुदीच्या कालावधीमध्ये अनेक उद्योगांना ग्राहकांकडून सेवा आणि वस्तूंची मागणी वाढेल अशी अपेक्षा आहे.
त्यामुळेच सरकार अधिक गोष्टींमध्ये सूट देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणे ज्यामध्ये मॉल, सलून, रेस्तराँ, व्यायमशाळा यासारख्या गोष्टी सुरु करण्यासंदर्भातील सूट आधीच देण्यात आली आहे. मात्र अजूनही देशभरामध्ये चित्रपटगृहे, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क सुरु करण्यात आलेले नाही.
सणासुदीचा कालावधी लक्षात घेता या सेवांना पुन्हा परवानगी दिली जाईल का याबद्दल आज केंद्र सरकारन निर्णय घेणार आहे. मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने चित्रपटगृह सुरु करण्यासंदर्भात परवानगी द्यावी अशी मागणी अनेकदा केली आहे. चित्रपटगृहे बंद असली तरी 21 सप्टेंबरपासून ओपन एअर थेअटर सुरु करण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे.