संसदेत कामगार विधेयक मंजूर! तुमच्या कामावरही होऊ शकतो परिणाम*
⚡ राज्यसभेमध्ये 15 विधेयकं मंजूर करण्यात आली असून 3 कामगार विधेयकांचाही समावेश आहे.
? काही नव्या बदलांसह सरकारने हे विधेयक पुन्हा संसदेत मांडले असून यातील काही तरतुदींना कामगार संघटनांचा जोरदार विरोधही होत आहे.
? ‘या’ आहेत विधेयकातील तरतुदी ?
▪️ संघटित आणि असंघटित या दोन्ही क्षेत्रातल्या कामगारांना नव्या प्रकारच्या सुविधांचा लाभ मिळेल असा सरकारचा दावा.
▪️ सर्व कामगारांना त्यांचं नियुक्ती पत्र देणं, त्यांचं वेतन डिजीटल पद्दतीनं करणं अनिवार्य असणार.
▪️ वर्षातून एकवेळा कामगारांची आरोग्य चाचणी करुन घेणं कंपन्यांना बंधनकारक असणार.
▪️ 300 पेक्षा कमी कामगार संख्या असलेल्या कंपन्या सरकारच्या अनुमतीशिवाय कर्मचाऱ्यांची संख्या कमी करु शकणार.
▪️ याआधी ही मर्यादा 100 पेक्षा कमी कामगार असलेल्या कंपन्यांसाठी होती. पण सरकारने ही मर्यादा वाढवली.
▪️ यापुढे कंपन्यांना जास्तीत जास्त कर्मचारी कॉन्ट्रॅक्टवर ठेवता येणार, याची मुभा या विधेयकामध्ये देण्यात आली.
▪️ एखाद्या कायमस्वरुपी कर्मचाऱ्याला कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी म्हणून रुपांतरित करण्याची मुभा नव्हती, ती मोकळीक या नव्या विधेयकानं दिली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖





