श्री.विजय मकासरे यांना मा. उच्च न्यायालयाचा दिलासा

श्री.विजय मकासरे यांना मा. उच्च न्यायालयाचा दिलासा औरंगाबाद -: श्री.विजय मकासरे रा. राहुरी तसेच एका अनोळखी व्यक्ती विरुद्ध राहुरी पोलिस स्टेशन मध्ये देवेंद्र सिताराम लांबे यांने त्यास विजय मकासरे यांनी राहुरी टाकळीमिया रोडवर, हॉटेल नंदिनी जवळ त्याची गाडी आडवून त्यास जीवे मारण्याची धमकी देवुन त्याचे जवळील राख रुपये २५,०००/- व सोन्याची अंगठी जबरदस्तीने विजय मकासरे यांच्या सोबत असलेल्या अनोळखी व्यक्तीने चोरुन घेतल्या संबंधी गुन्हा दाखल केला होता..वास्तवीक पाहता विजय मकासरे यांनी तत्कालीन पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी राहुरी येथील प्रसिध्द व्यापारी यांना विनाकारण मारहाण केल्याप्रकरणी दुधाळ यांच्या विरोधात पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला होता. तसेच यातील फिर्यादी देवेंद्र लांबे त्याचे विरुद्ध विजय मकासरे यांनी त्यांची सोशल मिडिया वर बदनामी करुन समाजामधील प्रतिष्ठा मलीन करण्याच्या उद्देशाने बातम्या टाकल्या होत्या. त्यासंबंधीतविजय मकासरे यांनी राहुरी पोलिस स्टेशन येथे देवेंद्र लांबे यांच्याविरुध्द तक्रार दाखल केली होती. त्यामुळे आता आपल्या विरुध्द पोलिस सायबर गुन्ह्या अंतर्गत गुन्हा दाखल करतील या भितीने तसेच विजय मकासरे यांच्याशी असलेल्या पुर्व वैमनस्यातुन व वैयक्तिक दोषापोटी देवेंद्र लांबे यांनी सदरचा गुन्हा राहुरी पोलिस स्टेशन मध्ये दाखल केलेला आहे. तसेच विजय मकासरे यांनी तत्कालीन पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांचे विरुद्ध मोर्चा काढल्याचा राग दुधाळ यांच्या मनात होता त्यामुळे त्यांनी देवेंद्र लांबे यांचेशी हात मिळवणी करुन विजय मकासरे यांच्या विरोधात संगनमताने खोटा गुन्हा दाखल केला.सदर प्रकरणात श्री. विजय मकासरे यांनी ॲडव्होकेट दत्तात्रय मरकड यांच्या मार्फत मा. उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद येथे अटकपूर्व जामीन मिळणेकामी अर्ज दाखल केला आहे. सदर अर्जावर प्राथमिक सुनावणी मा. उच्च न्यायालय यांनी विजय मकासरे यांना दिलासा देतांना सदर प्रकरणात पुढील तारखेपर्यंत त्यांना अटक करु नये असा आदेश दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here