DySP संदिप मिटके व prob ips आयुष नोपानी यांच्या पथकाची कारवाई
तब्बल सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त व सहा आरोपी अटकेत.
दि. 09/11/2020 रोजी श्रीरामपूर पोलिसांना श्रीरामपूर शहरातील शिवाजी रोड परिसरातील जुगार अड्डा चालू आहे असे खात्रीशिर बातमी मिळाली.
त्याप्रमाणे मा.श्री. मनोज पाटील पोलिस अधीक्षक अहमदनगर, मा.दिपाली काळे अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर याचे सूचना व मार्गदर्शन प्रमाणे श्री.संदिप मिटके DYSP श्रीरामपूर विभाग,अहमदनगर व श्री नोपाणी प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर यांच्या पथकाने
सदरच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून तब्बल सव्वा दोन लाखाचा(2,25,490/-) मुद्देमाल जप्त करून आरोपी अनुप लोढा, सागर धुमाळ, सुनील भांड, निलेश कत्रोड, विजय हतांगळे, लक्ष्मण मोरे यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
आरोपी विरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे गु. क्र. 2162/20 महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्री.संदिप मिटके DYSP श्रीरामपूर विभाग,अहमदनगर व
श्री नोपाणी प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांनी श्रीरामपूर येथील यांनी श्रीरामपूर येथील पदभार स्विकारल्यापासुन श्रीरामपूर तालुक्यातील अवैध धंदयांवर होत असलेल्या कारवाई मुळे अवैध धंदयांची धाब दणालले आहेत.
पोलिसांच्या या करावयाचे समाजातील सर्व घटकांतुन कौतुक होत आहे.