शेवगाव – शेवगाव-नेवासा तोडलसगत सागर लॉजवर रात्री कुंटणखानावर जिल्हा पोलिस प्रमुखांच्या विशेष पथकाने छापा टाकून तीन पुरुष व दोन परप्रांतीय महिलांना पकडण्यात आले.याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव ते नेवासा जाणारे रोडवरील सागर लॉजमध्ये सुरू असलेल्या कुंटणखानामध्ये जिल्हा पोलिस प्रमुखांच्या विशेष पथकाने शनिवारी (दि.२१) रात्री छापा टाकून तीन पुरुष व दोन परप्रांतीय महिलांना रंगेहात पकडले. अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधि नियम सन १९५६ चे कलम ३,४,५ प्रमाणे शेवगाव पोलिस ठाण्यात सामाजिक सेवक संदेश किसन जोगेराव व्यवसाय (रा. साळुंके विहार पुणे ता. जि. पुणे) यांच्या फिर्यादीनुसार सचिन रूपचंद मुसावत (रा. शेवगाव ता. शेवगाव), संदीप माणिक शेळके (रा. रामनगर नेवासा रोड ता. शेवगाव), अमर अश्पाक शेख (रा,पिंगेवाडी तालुका शेवगाव ) व महिला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यातील आरोपी हे स्वतःचे फायदा करिता कुंटणखाना चालवून आपसात संगनमत करून त्यावर मिळणाऱ्या पैशावर आपली उपजीविका भागवून पीडित मुलींना अवैध वेश्या व्यवसाय करण्यासाठी त्यांना कुंटणखाण्यामध्ये अडकवून वेश्या गमना करिता प्रवृत्त करून त्यांना गिऱ्हाईकांना दाखवून अवैधरित्या कुंटणखाना चालविताना मिळून आलेवरुन शेवगाव पोलीस ठाण्यात गु.र.न. व कलम -५१०/२०२१ भा.द.वि.कलम ३७०(३) सह स्त्रीया व मुली यांचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधि नियम सन १९५६ चे कलम ३,४,५ प्रमाणे रविवार (दि २२) दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलींना सुधारगृहात पाठविण्यात आले. घटनास्थळी पो. नि. प्रभाकर पाटील यांनी भेट दिली. पुढील तपास सपोनि ठाकरे हे करीत आहेत.
ताजी बातमी
अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या 17 कर्मचाऱ्यांची दिव्यांग प्रमाणपत्रे बोगस; कारवाईचे संकेत
अहिल्यानग्रः जिल्हा परिषदेच्या 17 कर्मचाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस आढळल्याचे वृत्त बाहेर येताच प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली....
निवडणुकीत मोठा बदल? EVMला ब्रेक, बॅलेट पेपर पुन्हा येणार?
ईव्हीएम हॅक होतं की नाही? हा वाद प्रत्येक निवडणुकीत चर्चेत असतो. धुळे सोलापूर मार्गावर EVM च्या विरोधात...
SSC Hall Ticket: कामाची बातमी ! दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट जारी; कसं डाउनलोड करायचं?
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढच्या महिन्यात सुरु होणार आहे. त्याआधी आता दहावीच्या विद्यार्थ्यांना...
चर्चेत असलेला विषय
भिवंडीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नऊ बांगलादेशींना अटक
भिवंडी : भारतात छुप्या मार्गाने येऊन भिवंडी शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नऊ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. भिवंडीत अनधिकृतपणे वास्तव्यास राहून अवनी...
Vardha | तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने सज्ज राहावे – जिल्हाधिकारी
दि.18.8.2021तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने सज्ज राहावे- जिल्हाधिकारी संसाधनांच्या व्यवस्थेसह तयारीचा घेतला आढावावर्धा, दि 18 ऑगस्ट (जिमाका):- जिल्ह्यात तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने...
चेक बाऊन्सच्या आरोपातून निर्दोष मुक्तता.
चेक बाऊन्सच्या आरोपातून निर्दोष मुक्तताफिर्यादी यास रक्कम देणे लागत नसल्याचे न्यायालयाने केले स्पष्टअहमदनगर...
जिल्हास्तरीय टास्क फोर्स समन्वय समितीची बैठक संपन्न कोरोना लसीकरणाचा घेतला आढावा
जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 26 - कोविड-19 लसीकरणातील अडचणी व उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्स समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात...






