शिवसेनेला बिहारमध्ये बिस्किट:

शिवसेनेला नापसंती

मुंबई  – बिहार विधान निवडणुकीच्या आखाड्यात आता शिवसेनाही उतरली आहे.  बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या जदयूने शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाला आक्षेप घेतल्याने शिवसेनेने उपलब्ध असेल ते निवडणूक चिन्ह घेऊन जदयू आणि भाजप यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे.
त्यासाठी शिवसेनेने निवडणूक आयोगाला तीन चिन्हांचा पर्याय सुचविलेला असताना, त्याच्यापैकी कोणताही पर्याय न देता ‘बिस्किट’ हे वेगळेच निवडणूक चिन्ह दिल्याने शिवसेनेने नापसंती दर्शवली आहे.
दरम्यान, विधानसभेच्या 50 जागांवर सेना आपले उमेदवार देणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली. बिहारमधील प्रादेशिक पक्ष हे शिवसेनेशी हातमिळवणी करण्यासाठी इच्छुक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here