शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांना जिल्हा रुग्णालयातून बुधवारी सायंकाळी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्यांची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. हायलाइट्स:डॉ. वैशाली झनकर यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज.डिस्चार्जनंतर नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी.जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता.vaishali zankar veerवैशाली झनकर वीरनाशिक: प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर आणि पुन्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्याने आठ लाख रुपयांच्या लाचखोरीत पोलिसांच्या ताब्यात असलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर वीर यांची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. बुधवारी सायंकाळी त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन दिवस डॉ. झनकर कारागृहातच असतील, हे निश्चित झाले आहे.( Vaishali Zankar Veer Bribe Case Updates )वाचा:भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड पालिकेत ACBचा छापा; भर बैठकीतच…शाळेला मंजूर असलेल्या वीस टक्के अनुदानानुसार शिक्षकांचे सुधारित वेतन काढण्याची परवानगी देण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच स्वीकारण्यात आली. या प्रकरणी झनकर पोलिसांच्या ताब्यात असताना मंगळवारी (दि. १७) त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यावेळी जामिनासाठी खटाटोप करूनही तो नामंजूर करण्यात आला. त्यानंतर छातीत दुखत असल्याचे कारण पुढे करीत त्या जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या. बुधवारी सकाळी त्यांचे नातेवाइक रुग्णालयात आले. पोलिसांच्या बंदोबस्तात झनकरांची देखभाल नातेवाइक करीत होते. दुपारी अचानक त्रास होत असल्याचे सांगितल्याने त्यांना तपासणीसाठी संदर्भ रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी रुग्णवाहिकेत त्या ‘व्हिलचेअर’वर असल्याचे दिसले. मात्र, रुग्णवाहिकेतून उतरल्यावर त्या ठणठणीत चालत असल्याचे दिसले. तसेच रुग्णालयात तपासणीअंती त्यांची प्रकृती स्थिर असल्याची नोंद वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली. त्यानुसार झनकरांना डिस्चार्ज देण्याची प्रक्रिया सुरू झाली. दुसरीकडे बुधवारी पुन्हा न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाली. परंतु, झनकरांचे वकील न्यायालयात उपस्थित नसल्याचे समजले. त्यामुळे न्यायालयाने पुन्हा जामीन अर्ज फेटाळून लावत न्यायालयीन कोठडी कायम ठेवली. त्यामुळे सायंकाळी जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर झनकरांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
Home English News Lawyer शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांना जिल्हा रुग्णालयातून बुधवारी सायंकाळी डिस्चार्ज .त्यांची रवानगी...
ताजी बातमी
अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या 17 कर्मचाऱ्यांची दिव्यांग प्रमाणपत्रे बोगस; कारवाईचे संकेत
अहिल्यानग्रः जिल्हा परिषदेच्या 17 कर्मचाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस आढळल्याचे वृत्त बाहेर येताच प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली....
निवडणुकीत मोठा बदल? EVMला ब्रेक, बॅलेट पेपर पुन्हा येणार?
ईव्हीएम हॅक होतं की नाही? हा वाद प्रत्येक निवडणुकीत चर्चेत असतो. धुळे सोलापूर मार्गावर EVM च्या विरोधात...
SSC Hall Ticket: कामाची बातमी ! दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट जारी; कसं डाउनलोड करायचं?
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढच्या महिन्यात सुरु होणार आहे. त्याआधी आता दहावीच्या विद्यार्थ्यांना...
चर्चेत असलेला विषय
शेवटी मुंबई पोलिसांनी हिसका दाखवला, भरड्राम्यातून नवनीत राणांना उचललं, गाडीत डांबलं, नेमकं काय घडलं?
शेवटी मुंबई पोलिसांनी हिसका दाखवला, भरड्राम्यातून नवनीत राणांना उचललं, गाडीत डांबलं, नेमकं काय घडलं?
मुंबई: तारीख 23 April 2022
Tirupati Temple Worth Over ₹ 2.5 Lakh Crore, Is Richer Than Wipro, Nestle
New Delhi:
Tirupati's world famous Lord Venkateswara temple's net worth of over ₹ 2.5 lakh crore...
महानगरपालिके मार्फत पाणीपुरवठा अनियमित :पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिके सहकार्य करावे.
दी.8/10/2020 रोजी अहमदनगर महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्त्वाच्या देहरे येथे...
राजौरीमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दहशतवादी ठार
राजौरी, 5 ऑगस्ट: जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील खवास भागात शनिवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला,...





