
दि.१६ ऑगस्ट.२०२१
सातारा :- शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडुन चैन स्नॅचिंग करणारी टोळी जेरबंद करुन चैन स्नॅचिंगचे ०३ गुन्हे उघडकीस आणत ७५,९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश. सातारा जिल्हयात जबरीने सोनसाखळी चोरी(चैन स्नेचिंग)चे प्रकार घडल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणणेकामी सातारा जिल्हाचे पोलीस अधीक्षक मा.श्री अजयकुमार बन्सल सो, अपर पोलीस अधीक्षक मा.श्री धीरज पाटील सो यांनी जिल्हा पोलीसांना सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सहा पोलीस अधीक्षक मा.आंचल दलाल सो व मा.गणेश किंद्रे उ.वि.पो.अ.सातारा ग्रामीण चार्ज सातारा शहर यांनी सातारा शहर, व परिसरातील चैन स्नैचिंगचे गुन्हे उघडकिस आणणेसाठी शाहुपुरी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री संजय पतंगे, स.पो.नि.श्री संदिप शितोळे व गुन्हे प्रकटीकरण शाखा यांना मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या. सदरचे गुन्हे उघडकिस आणणेचे अनुषंगाने शाहुपुरी पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असतांना त्यांना जुना मोटार स्टॅड येथील ज्वेलर्स दुकानाचे येथे दोन इसम संशयितरित्या उभी असल्याचे दिसले. गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदारांनी दोन्ही इसमांकडे विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली . नमुद संशयित इसमांची झडती घेतली असता त्यांचेकडे सोन्याचे दागिने मिळुन आले. सदर दागिन्यांबाबत गुन्हे पथकाने विचारपुस केली असता दोन्ही इसमांनी समाधानकारक माहीती दिली नाही . सदरचे दागिने चोरीचे असल्याबाबत संशय आल्याने त्या इसमांकडे मिळुन आलेले सोन्याचे दागिने, बजाज मोटारसायकल वगैरे ७५,९००/- रुपये किमतीचा मुद्देमाल असे जप्त करणेत आले व त्यांच्या विरुद्ध शाहुपुरी पोलीस ठाणेत गुन्हा नोंद करुन त्यांना अटक करणेत आली आहे. सदर गुन्हयाचे तपासामध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेने आरोपीकडे कौशल्याने विचारपुस केली असता आरोपींनी रेवडी गावचे हद्दीत, इस्लामपुर जि.सांगली हद्दीत, वेचले ता.जि.सातारा गावचे हद्दीत असे तीन ठिकाणी चैन स्नॅचिंगचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली.सदरबाबत (१) कोरेगाव पोलीस ठाणेस गु.र.नं.२१७/ २०२१ भादंविसंक.३९२,३४, (२) इस्लामपुर पोलीस ठाणे जि.सांगली गु.र.नं.६१५/ २०२१ भादविसंक.३८०,३४ प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा प्रकारे शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक व जि.वि.शा. यांचे पथकाने संयुक्त कारवाई करत आरोपीकडे कौशल्याने तपास करुन जिल्हयातील व परजिल्हयातील एकुण तीन चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकिस आणुन चेन स्नॅचिंग करणारी टोळी जेरबंद केली आहे व त्यांचेकडुन ७५,९००/ -रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई मा.अजयकुमार बन्सल पोलीस अधिक्षक, सातारा, मा.धिरज पाटील अपर पोलीस अधिक्षक,श्रीमती आंचल दलाल सहा.पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संजय पतंगे सहा.पोलीस निरीक्षक संदिप शितोळे, पो.हेड.कॉ.हसन तडवी, पो.नाईक लेलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, पोकों पंकज मोहिते, ओंकार यादव, मोहन पवार व जिल्हा विशेष शाखेचे पो.नाईक राकेश खांडके व पो.हे.कॉ. शेलार यांनी केली आहे.






