भुसावळ : शासकीय कामात अडथळा, शिवीगाळ प्रकरणी भुसावळ शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुंडलिक दगडू सूर्यवंशी (५२, रा.हिरानगर, भुसावळ) असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे.तक्रारदार तथा शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी दिनेश पाटील हे शनिवारी सकाळी नऊ वाजता नाहाटा महाविद्यालयाजवळील चौफुलीजवळ कर्तव्यावर असताना संशयित आरोपी सूर्यवंशी हे प्लॅटिना एमएच १९ डीएस.१३०९ दुचाकी येत असताना त्यांना थांबवण्यात आले. लायसन्सची विचारणा केली असता त्यांनी लायसन्स दाखवले मात्र त्याची मुदत संपल्याचे लक्षात आल्याने कर्मचारी पाटील यांनी त्याबाबत २०० रुपये दंडाची पावती दिली. याचा सूर्यवंशी यांना राग आला त्यांनी पोलीस कर्मचारी दिनेश पाटील, प्रदीप पाटील यांना शिवीगाळ करुन अंगावर धावून येऊन धक्काबुक्की करुन धमकावले व शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करीत गोंधळ निर्माण केला.याप्रकरणी पाटील यांच्या फिर्यादीनुसार सूर्यवंशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बाजारपेठ पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.याबाबत दिनेश पाटील यांच्या फिर्यादीवरुन बाजारपेठ पोलिसात गु.र.नं. ३६०/ २१, भा.दं.वि. ३५३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गणेश धुमाळ तपास करीत आहेत.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणा-या ४ आरोपींना जन्मठेप : २ महिलाना ३ वर्ष तुरुंगवास
अहमदनगर- नगर तालुक्यात घडलेल्या घटनेत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणा-या ४ आरोपींना जन्मठेप तर २ महिला आरोपींना ३ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा...
अँट्रॉसिटीतून शिक्षकाची निर्दोष मुक्तता: बारामती विशेष सत्र न्यायालयाचा निकाल.
अँट्रॉसिटीतून शिक्षकाची निर्दोष मुक्तता बारामती विशेष सत्र न्यायालयाचा निकाल.
बारामती, शाहू हायस्कूल येथील चित्रकला शिक्षकाची अनुसूचित जाती जमाती अत्याचार...
किरकोळ कारणावरुन पती-पत्नीस बेदम मारहाण.
किरकोळ कारणावरुन पती-पत्नीस 6 जणांनी केली बेदम मारहाण: अहमदनगर:- नगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या इंगळे वस्ती येथे किरकोळ कारणातून पती-पत्नीस लाकडी...
न्यायालयाचे दिलासे एकाच राजकीय पक्षाला कसे मिळतात; आम्हाला का मिळत नाही?- संजय राऊत
मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. विधानसभा...







