डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गोनायझेशनने (डीआरडीओ) शुक्रवारी, ९ ऑक्टोबर २०२० रोजी भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. डीआरडीओद्वारे तयार करण्यात आलेल्या अँटी रेडीएशन मिसाईल रुद्रम-१ क्षेपणास्त्राची सुखोई-३०द्वारे यशस्वी चाचणी करण्यात आली. डीआरडीओतर्फे ओदीशाच्या समुद्र किनारी असलेल्या तटावर सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी रुद्रम-१चं यशस्वी परीक्षण करण्यात आलं.
संपूर्ण स्वदेशी बनावटीचे (मेड इन इंडिया) असलेले रुद्रम-१ हे क्षेपणास्त्र शत्रूवर कितीही उंचावर डागले जाऊ शकते. तसेच कुठल्याही प्रकारच्या सिग्नल तसेच रेडीएशन पकडण्यासाठी तत्पर आहे. त्याशिवाय आपल्या रडारमध्ये रेडीएशन घेऊन नष्टही करू शकते. विशेष म्हणेजे रुद्रम-१ या क्षेपणास्त्राला सुखोई आणि तेजस या दोन्ही लढाऊ विमानांमध्ये वापरले जाऊ शकते.