व्याजदर जैसे थे तर 9.5 टक्क्यांनी अर्थव्यवस्था घसरणार: RBI

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आर्थिक वर्ष 2021 मध्ये जीडीपीमध्ये 9.5 टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता वर्तवली असून रेपो दर जैसे थे राहणार असल्याचेही म्हटले आहे.

असे असेल भविष्यातील चित्र :

कोरोना संकटामुळे मागणी कमी राहणार असून आगामी काळातही महागाईचा दर जास्त असेल अशी भीती RBI ने वर्तवली आहे.

मात्र RBI ने रेपो दरामध्ये कोणताही बदल केला नसून तो 4 टक्क्यांवर कायम आहे तसेच बँकेने रिव्हर्स रेपो दरातही बदल केलेला नाही

ग्राहकांना डिसेंबर 2020 पासून कधीही आरटीजीएस सुविधेचा वापर करता येणार असल्याचेही RBI ने म्हटले आहे.

दरम्यान, मार्च 2022 पर्यंत एक लाख कोटी रुपयांची मदत देण्याची तरतूद RBI ने केली असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here