राहाता येथील विरभद्र मंदीरामधील मुर्तीचे चांदीचे मुकूट व दागिणे चोरणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
दिनांक १५/०९/२०२० रोजी पहाटेचे वेळी राहाता येथील विरभद्र मंदीरामधील मुर्तीचे चांदीचे मुकूट, पादूका . व इतर चांदीचे दागिणे असा एकूण ३,८५,२००/-रु. किं. चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने मंदीराचे दरवाजाचे कूलूप तोडून चोरुन नेले होते. सदर घटने बाबत फिर्यादी श्री. अरविंद चांगदेव गाडेकर, वय- ५० वर्षे, रा. नवनाथनगर, राहाता यांचे फिर्यादीवरुन राहाता पो. स्टे. येथे गुरनं. ५०७/२०२०, भादवि कलम ४५७, ३८० प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेवून घटनास्थळी मा. श्री. अखिलेश कुमार सिंह साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. दिपाली काळे, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर, श्री. सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग, शिर्डी, श्री. दिलीप पवार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी तात्काळ भेटी दिल्या. मा. पोलीस अधीक्षक साो, अहमदनगर यांनी दिलेल्या सुचना प्रमाणे पोनि/दिलीप पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक नेमून पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना आरोपीतांचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या. पथकातील अधिकारी व कर्मचारी गुन्ह्यातील गेले मालाचा व आरोपीतांचा शोध घेत असताना पोनि/दिलीप पवार यांना गुप्त बातमीदारांकडून खात्रीशिर माहीती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा भास्कर पथवे, रा. नांदूरी दुमाला, ता- संगमनेर याने केला असल्याची खात्रीशीर माहीती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्ता हींगडे, मनोज गोसावी, पोना/संदीप पवार, शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, दिपक शिंदे, पोकॉ/योगेश सातपूते, सागर सुलाने, राहूल सोळूंके, मच्छिन्द्र बडे, चालक पोहेकॉदिविदास काळे, संभाजी कोतकर, धुळे अशांनी मिळून नांदुरी दुमाला येथे जावून आरोपीचे ठावठिकाणाबाबतची माहीती घेतली असता सदर आरोपी हा पेमगिरी डोंगरातील जंगलामध्ये लपून बसला असल्याची माहिती मिळाली. पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी आरोपीस पकडण्यासाठी रात्रभर जंगलामध्ये सापळा लावला. परंतू मुसळधार पाऊस असल्याने आरोपी रात्रभर जंगलाचे बाहेर आला नाही. त्यामूळे पहाटेच्या सुमारास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी जंगलामध्ये जावून आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे १) भास्कर खेमाजी पथवे, वय- ४२ वर्षे, रा. नांदुरी दुमाला, ता- संगमनेर यास ताब्यात घेतले. त्यास जंगलामधून बाहेर आणून विश्वासात घेवून गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सुरुवातील उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदाराचे मदतीने केला असल्याचे सांगीतले. त्यावरुन साथीदार आरोपीचा शोध घेतला. परंतू तो मिळून आला नाही. ताव्यात घेतलेल्या आरोपीकडे चोरलेल्या चांदीच्या दागिण्याबाबत विचारपूस केली असता आरोपीने त्याचे नांदुरी दुमाला येथील शेतामध्ये लपवून ठेवलेले विरभद्र मंदीरामधील मुर्तीचे चांदीचे मुकूट, पादूका व इतर चांदीचे दागिणे काढून दिल्याने ३,८५,२००/-रु. किं. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोपीस मुद्देमालासह राहाता पो.स्टे. ला हजर करण्यात आलेले असून पुढील तपास राहाता पो.स्टे. हे करीत आहेत.
तसेच आरोपी नामे भास्कर खेमाजी पथवे याने दोन महीण्यापुर्वी कोरठन खंडोबा ता.पारनेर येथील मंदिरात पालकांच्या चोरी केलेची कबुली दिली असून तसा पारनेर पोस्टे नं ४७७/२०२० भादवि कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
आरोपी भास्कर खेमाजी पथवे हा सराईत गुन्हेगार असून
दाखल आहेत.
१) पारनेर पो. स्टे. गुरनं.
२) पारनेर पो.स्टे. गुरनं.
३) पारनेर पो.स्टे. गुरनं.
४) संगमनेर तालुका पो. स्टे. गुरनं. ५) नाशिक रोड पो.स्टे. गुरनं.
त्याचे विरुध्द यापुर्वी खालील प्रमाणे गुन्हे
२७४/२०१८, भादवि कलम ४५७, ३८० २०९/२०१७, भादवि कलम ३८०
T २५३/२०१८, भादवि कलम ४५७, ३८० 1 १६८/२०१३, भादवि कलम ४५९, ३८०, ५११ २५०/२०१६, भादवि कलम ३७९, ३४
सदरची कौतुकास्पद कामगिरी ही मा. श्री. अखिलेश कुमार सिंह साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती दिपाली काळे/कांबळे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व श्री. सोमनाथ वाघचौरे. उपविभागीय पोलीस अधिकारी., शिर्डी विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.