वीजबिल थकबाकी वसुलीसाठी महावितरणच्या “हर घर दस्तक” मोहिमेस औरंगाबाद परिमंडलात सुरुवात.

436
  • ▪️ _मोहिमेत अभियंते, तांत्रिक कर्मचाऱ्यांसह महावितरणच्या विविध संवर्गातील संपूर्ण कर्मचारी सहभागी._
  • ▪️ _ग्राहकांचा वीजबिल भरून “हर घर दस्तक” मोहिमेस सकारात्मक प्रतिसाद._
  • वीजबिलांच्या प्रचंड थकबाकीमुळे महावितरण आर्थिक अडचणीत आलेली आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांच्या संकल्पनेतून “हर घर दस्तक” मोहीम राबवण्यात येत आहे.
  • ग्राहक नियमित व वेळेत वीजबिल भरत आहेत का, हे पाहण्यासाठी महावितरण कर्मचारी आता घरोघरी जाऊन वीजबिल भरल्याची खात्री करत आहेत. ग्रामीण भागात काही ठिकाणी वीजबिल ऑनलाईन भरण्यास अडचण आल्यास किंवा वीजबिल भरणा केंद्र जवळ नसल्यास ग्राहकाचे बिल थकीत राहू नये म्हणून महावितरणचे कर्मचारी जागेवरच वीजबिलाची रक्कम स्वीकारून महावितरणच्या *”एम्प्लॉई मित्र”* ॲपद्वारे भरणा करत असून ग्राहकांना बिल भरल्याची पावती जागेवरच देत आहे.
  • ▪️जे ग्राहक बिल भरण्यास प्रतिसाद देत नाहीत, त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई या मोहिमेत करण्यात येत आहे. तसेच थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही कुणी ग्राहक अनधिकृतरित्या वीज वापरत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तरी वीजग्राहकांनी आपली वीजबिलांची थकबाकी व चालू बिले भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here