विभागीय माहिती कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

419


औरंगाबाद, दि. 15 (जिमाका) – माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि माहिती केंद्र, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजावंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजवंदनाच्या वेळी कोरोना विषयक नियमांचे पालन करण्यात आले. यावेळी सर्वांनी राष्ट्रीय ध्वजास सलामी देऊन राष्ट्रगीत म्हटले. यावेळी सहायक संचालक प्रमोद धोंगडे, मीरा ढास, माहिती सहायक संजीवनी जाधव, श्याम टरके, रेखा पालवे आदींसह संचालक कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, माहिती केंद्रातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here