वाहिरा येथील तरुणांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ
वाहिरा ता- आष्टी :
वाहिरा गाव परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत आहे.आज गावातील पाच तरुणांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली.जीवनात दारू व मांसहार करणार नाही.अशी शेख महंमद महाराजांना साक्षी ठेऊन शपथ घेतली. व पवित्र समजली जाणारी तुळशीमाळ गळ्यात घातली.इथून पुढे जीवनात समाजकार्य व शेख महंमद महाराजांचे विचार अंगिकारून जगण्याचा संकल्प केला. यात श्री.संतोष अंकुश झांजे,श्री.प्रतापराव सावळेराम खामकर,श्री.विठ्ठल अशोक चौधरी,श्री.राजू शंकर हगारे,श्री.किशोर(गणेश)माणिक आटोळे यांनी हा संकल्प केला. यावेळी श्री.सतीश आटोळे उपसरपंच वाहिरा यांनी मार्गदर्शन केले.
व श्री.किसन आटोळे सर यांनी व्यसनमुक्तीची व नीतिनियम पाळण्याची शपथ दिली.
यावेळी श्री.हरी मेटे,श्री.बापूसाहेब झांजे . शेख महंमद महाराजांचे वंशज मोसिम शेख उपस्थित होते.या अगोदर एक महिन्यांपूर्वी श्री.सुधीर नारायण पवार,श्री.सतीश बबन झांजे , श्री. अमोल गजेंद्र कुलथे यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केला . आज ते सर्वजण आंनदी जीवन जगत आहेत. असाच सर्व तरुण मंडळींनी विचार केला व तो अंमलबजावणीत आणला तर नक्कीच वेगाने कौटुंबिक, सामाजिक प्रगती होईल.